'खोदा पहाड़, निकला चुहा', रामायणचा टीझर लाँच होताच प्रसिद्ध दिग्दर्शकाची खोचक पोस्ट, रणबीरला मारला टोमणा?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Ramayana teaser: रणबीर कपूरचा बहुप्रतिक्षित ४००० कोटींचा सिनेमा 'रामायण'चा टीझर रिलीज झाल्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शकाने एक क्रिप्टीक पोस्ट केली असून यामुळे वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत.
advertisement
1/8

आज संपूर्ण देशात जल्लोषात हनुमान जयंती उत्सव साजरा केला जात आहे. याच सणाचे औचित्य साधून रणबीर कपूरचा बहुप्रतिक्षित ४००० कोटींचा सिनेमा 'रामायण'चा टीझर लाँच करण्यात आला असून आज दिवसभर हा टीझर ट्रेंडमध्ये आहे.
advertisement
2/8
गेल्या अनेक महिन्यांपासून रणबीरची मुख्य भूमिका असलेल्या रामायणची चर्चा सुरू आहे. याबाबत अनेक बातम्या समोर येत होत्या. अशातच आज रिलीज झालेल्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता ताणल्या आहेत. ही फिल्म कधी थिएटरमध्ये धडकतेय यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.
advertisement
3/8
या फिल्ममध्ये बॉलिवूडचा हँडसम हंक रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या रुपात आहे, तर साऊथची लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवीने माता सीतेचे पात्र साकारले आहे. दरम्यान, टीझर रिलीज झाल्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शकाने एक क्रिप्टीक पोस्ट केली असून यामुळे वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत.
advertisement
4/8
प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी टीझर रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्यांनी लिहिलंय, "खोदा पहाड... निकला चूहा." त्यांनी थेट 'रामायण'चं नाव घेतलं नसलं, तरी या पोस्टच्या टायमिंगमुळे नेटकऱ्यांनी त्यांचा रोख नक्की कोणाकडे आहे, याचा अचूक अंदाज लावला आहे.
advertisement
5/8
संजय गुप्ता यांच्या या एका ओळीच्या पोस्टने इंटरनेटवर जणू आग लावली आहे. रणबीर कपूरचे चाहते आणि चित्रपटप्रेमींनी गुप्ता यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. 'रामायण'सारख्या ४००० कोटींच्या भव्य प्रकल्पाची तुलना उंदराशी केल्याने नेटकरी संतप्त झाले आहेत.
advertisement
6/8
संजय गुप्ता यांनी याआधीही 'रामायण'वर ताशेरे ओढले आहेत. निर्माते नमित मल्होत्रा यांनी जाहीर केलं होतं की, हा चित्रपट ४००० कोटींच्या मोठ्या बजेटमध्ये बनत आहे, तेव्हाही गुप्ता यांनी एक खोचक पोस्ट केली होती.
advertisement
7/8
त्यावेळी संजय गुप्ता यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, "मॅट्रिक्स, लॉर्ड ऑफ द रिंग्ज, अवतार, ड्युन, स्टार वॉर्स या सर्व चित्रपटांनी प्रदर्शनाआधी कधीच आपल्या बजेटबद्दल किंवा VFX बद्दल डंका वाजवला नव्हता. त्यांचं कामच त्यांच्याबद्दल बोलतं." त्यावेळीही त्यांचा इशारा 'रामायण'कडेच असल्याचं बोललं जात होतं.
advertisement
8/8
संजय गुप्ता यांनी कितीही टीका केली असली, तरी रणबीर कपूरचा राम अवतार आणि दाक्षिणात्य सुपरस्टार यश याची रावण म्हणून असलेली छोटीशी झलक पाहून प्रेक्षक मात्र सुखावले असून दिवाळी २०२६ मध्ये या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'खोदा पहाड़, निकला चुहा', रामायणचा टीझर लाँच होताच प्रसिद्ध दिग्दर्शकाची खोचक पोस्ट, रणबीरला मारला टोमणा?