TRENDING:

IAS वसुमना पंत चंद्रपूरच्या पहिल्या महिला कलेक्टर, नागपूरवरून बदली

Last Updated:

IAS Transferred: सनदी अधिकारी विनय गौडा जीसी यांच्याकडून वसुमना पंत यांना कार्यभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
चंद्रपूर: वसुमना पंत यांची चंद्रपूरच्या नव्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्या नागपूर महानरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त होत्या. वसुमना पंत यांच्या रुपाने चंद्रपूरला पहिल्या महिला जिल्हाधिकारी लाभल्या आहेत. अतिशय धडाडीच्या आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून वसुमना पंत यांची ओळख आहे.
वसुमना पंत (सनदी अधिकारी)
वसुमना पंत (सनदी अधिकारी)
advertisement

चंद्रपूरचे मावळते जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या नव्या नियुक्तीबाबत मात्र स्पष्टता नाही. गौडा यांनी जिल्ह्यात तीन वर्षांहून अधिक काळ सेवा केली आहे. गौडा यांच्याकडून पंत यांना कार्यभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नागपूर महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करताना IAS वसुमना पंत यांची उत्तम कामगिरी

वसुमना पंत यांच्या बदलीनंतर नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी छत्रपती संभाजीगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वसुमना पंत यांनी नागपूर महापालिरेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करीत असताना शहर स्वच्छता, आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन आणि नागरी सेवा सुधारण्यासंबंधी अतिशय उत्तम कामगिरी केली. शहरात 'डीप क्लीनिंग' मोहीम, इको-फ्रेंडली गणपती उत्सव आणि आरोग्य जागृती उपक्रम अतिशय प्रभावी पद्धतीने राबवले.

advertisement

कोण आहेत IAS वसुमना पंत?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, केळी अन् कांद्याचे भाव भूईसपाट, लिंबू काय मिळाला दर?
सर्व पहा

सनदी अधिकारी वसुमना पंत या महाराष्ट्र केडरच्या २०१७ बॅचच्या आयएएस (IAS) अधिकारी आहेत. सध्या त्यांच्याकडे नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी होती. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्रात एमए. केले असून, प्रशासकीय कारकीर्दीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक जिल्हाधिकारी, सहायक सचिव, अतिरिक्त सहायक जिल्हाधिकारी अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
IAS वसुमना पंत चंद्रपूरच्या पहिल्या महिला कलेक्टर, नागपूरवरून बदली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल