TRENDING:

Weather Alert : पुढील 24 तास धोक्याचे, अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार, या जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
2 एप्रिल रोजी हवामान विभागाने राज्यातील 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर 23 जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी. पाहुयात विभागानुसार हवामानाचा अंदाज कसा असेल.
advertisement
1/7
पुढील 24 तास धोक्याचे, अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार, या जिल्ह्यांना अलर्ट
महाराष्ट्रात अवकाळी पाऊस गेले तीन ते चार दिवस जोरदार कोसळत आहे. आणखी काही दिवस अवकाळी संकट कायम असणार आहे. 2 एप्रिल रोजी हवामान विभागाने राज्यातील 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर 23 जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी. पाहुयात विभागानुसार हवामानाचा अंदाज कसा असेल.
advertisement
2/7
कोकण विभागातील मुंबई, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या सोबतच उष्णताही जाणवेल. तर ठाणे, रायगड आणि रत्नागिरीमध्ये अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी पाऊस कोसळेल. ताशी 30-40 किमी वेगवान वारे वाहतील.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुण्याला अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर कोल्हापूरमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून येथे मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातही अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी वादळी वाऱ्यांचा वेग वाढू शकतो. त्यामुळे काळजी घ्यावी.
advertisement
5/7
मराठवाड्यातील अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीडला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ताशी 50-60 किमी वेगाने वारे वाहतील. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धराशीवाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
6/7
विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या पिकांची काळजी घ्यावी.
advertisement
7/7
दरम्यान, राज्यात 2 एप्रिल रोजी अवकाळीचा धोका कायम आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : पुढील 24 तास धोक्याचे, अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार, या जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल