Weather Alert: आता काळजी घ्याच! महाराष्ट्रावर येतंय अवकाळीचं तुफान, 33 जिल्ह्यांना धोक्याचा अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात पुढील 4 दिवस अवकाळी संकटाचा धोका कायम असेल. आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/7

महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अवकाळी संकट घोंघावत आहे. मार्चअखेर वादळी वाऱ्यांसह पाऊस आणि गारपिटीचा धोका वाढला. आता 1 एप्रिलला देखील जवळपास संपूर्ण महाराष्ट्राला अवकाळी पाऊस झोडपणार आहे. ताशी 30 ते 60 किमी वेगाने वारे वाहून पाऊस आणि गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील 24 तासांसाठी 26 जिल्ह्यांना यलो तर 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असेल.
advertisement
2/7
कोकणात दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. तापमानाचा पारा चांगलाच चढला असून उकाडा वाढला आहे. अशातच मुंबई आणि पालघर वगळता संपूर्ण कोकणाला आज वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात हवामान ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान 33-55 अंशांच्या दरम्यान असेल.
advertisement
3/7
उत्तर महाराष्ट्राला देखील आज अवकाळी तुफानाचा धोका आहे. नाशिकमध्ये ताशी 50-60 किमी वाऱ्यांसह पाऊस आणि गारपिटीचा धोका असून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर धुळे, नंदुरबार आणि जळगावला आज यलो अलर्ट आहे. या जिल्ह्यांत देखील ताशी 40-50 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहील.
advertisement
4/7
मध्य महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पारा चांगलाच चढला असून अवकाळी पाऊसही झोडपून काढत आहे. आज पुणे, अहिल्यानगर आणि सातारा जिल्ह्यांत वादळी पाऊस आणि गारपिटीची तीव्रता अधिक राहील. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे. तर कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहून तुरळक ठिकाणी गारपीट होईल. कमाल तापमान 34-37 अंशांच्या दरम्यान राहील.
advertisement
5/7
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना धोक्याचा इशारा कायम आहे. छत्रपती संभाजीनगरसह बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांत गारांच्या पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट असेल. तर लातूर आणि धाराशिवमध्ये तीव्रता अधिक राहणार असल्याने या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कमाल तापमान 36-39 अंशांच्या दरम्यान राहील.
advertisement
6/7
विदर्भात देखील उष्णतेचा पारा चढला असून तापमान चाळिशीच्या घरात गेले आहे. अशातच आज संपूर्ण विदर्भावर अवकाळीचे काळे ढग राहतील. नागपूर, अमरावतीसह सर्वच जिल्ह्यांत ताशी 40-60 किमी वेगाने वारे वाहून वादळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज आहे. या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून यवतमाळला आज ऑरेंज अलर्ट असेल.
advertisement
7/7
दरम्यान, राज्यात 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान अवकाळीचा धोका कायम आहे. या काळात वीज पडणे, जोरदार वारे आणि गारपिटीमुळे शेती, फळबागा आणि पशुधनाला नुकसान होऊ शकते. कोकण आणि विदर्भात उकाडा जास्त जाणवेल. काही भागांत रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा जास्त राहू शकते. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: आता काळजी घ्याच! महाराष्ट्रावर येतंय अवकाळीचं तुफान, 33 जिल्ह्यांना धोक्याचा अलर्ट