खाडी देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केल्यानंतर, आता इराणने आपला मोर्चा थेट अमेरिकेतील बड्या टेक कंपन्यांकडे वळवला आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने (IRGC) मंगळवारी (३१ मार्च २०२६) गुगल आणि मायक्रोसॉफ्टसह १८ प्रमुख अमेरिकन कंपन्यांवर हल्ला करण्याची उघड धमकी दिली आहे. या इशाऱ्यामुळे आता जागतिक कॉर्पोरेट क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
कोणत्या कंपन्यांना इराणकडून धोका?
advertisement
IRGC ने स्पष्ट केले आहे की, जर भविष्यात कोणत्याही इराणी नेत्याची हत्या झाली, तर खाडी देशांतील अमेरिकन कंपन्यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. इराणच्या हिटलिस्टमध्ये ॲपल, गुगल, मायक्रोसॉफ्ट, मेटा, टेस्ला, इंटेल, सिस्को, एचपी, ओरॅकल, आयबीएम, डेल, पालेंटिर, एनवीडिया, जेपी मॉर्गन, जनरल इलेक्ट्रिक, स्पायर सोल्यूशन्स, G42 आणि बोइंग यांसारख्या दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे.
आयटी कंपन्यांना टार्गेट करण्याचे काय?
इराणच्या दाव्यानुसार, या तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रातील कंपन्या अमेरिकन आणि इस्रायली गुप्तचर यंत्रणांना मदत करत आहेत. विशेषत: आयटी आणि एआय (AI) क्षेत्रातील कंपन्यांचा वापर इराणविरुद्ध कारस्थान करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप IRGC ने केला आहे. यामध्ये 'OpenAI' आणि 'Anthropic' सारख्या आघाडीच्या संस्थांचाही उल्लेख करण्यात आला आहे.
जनरल जमशेद इशाकी यांच्या हत्येचा बदला?
इराणचे ब्रिगेडियर जनरल जमशेद इशाकी यांच्या हत्येनंतर IRGC आता आक्रमक झाल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकन-इस्रायली हवाई हल्ल्यात इशाकी यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी IRGC ने केली आहे. इशाकी हे जनरल स्टाफचे मुख्य सल्लागार होते आणि गेल्या वर्षी अमेरिकेने त्यांच्यावर निर्बंध लादले होते. या हत्येचा बदला म्हणून आता इराण सायबर किंवा प्रत्यक्ष हल्ल्यांद्वारे या कंपन्यांना लक्ष्य करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
