IPL 2026 : शेवटच्या क्षणाची डील शाहरुखला महागात, दुसऱ्याच सामन्यात रहाणेने डोक्याला हात लावला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 मध्ये केकेआरची सुरूवात निराशाजनक झाली. मुंबईविरुद्धच्या सामन्यात केकेआरला पराभवाचा धक्का बसला. 220 रन केल्यानंतरही केकेआरच्या बॉलरना एवढं मोठं आव्हान रोखता आलं नाही.
advertisement
1/9

मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर केकेआर दुसऱ्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरली, या सामन्यात केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला.
advertisement
2/9
पहिले बॅटिंग करायला आलेले हैदराबादचे ओपनर ट्रॅविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी केकेआरच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. पॉवर प्ले च्या 6 ओव्हरमध्ये हैदराबादने एक विकेट गमावून 84 रन केले. अभिषेकने 21 बॉल 48 तर हेडने 21 बॉलमध्ये 46 रन केले.
advertisement
3/9
आयपीएलचा मोसम सुरू व्हायच्या आधीच केकेआरच्या फास्ट बॉलरना दुखापतींचं ग्रहण लागलं. हर्षित राणा दुखापतीमुळे पूर्ण मोसमातून बाहेर झाला, तर मथिशा पथिराणा दुखापतीतून पूर्ण बरा झाला नसल्यामुळे खेळू शकत नाहीये.
advertisement
4/9
आयपीएल 2026 साठी झालेल्या लिलावात केकेआरने मुस्तफिजुर रहमानला विकत घेतलं, पण भारत-बांगालदेश संबंध ताणले गेल्यामुळे मुस्तफिजुरवर आयपीएलमध्ये बहिष्कार टाकण्यात आला.
advertisement
5/9
मुस्तफिजुरचा बदली खेळाडू म्हणून केकेआरने शेवटच्या क्षणी झिम्बाब्वेचा फास्ट बॉलर ब्लेसिंग मुझरबानीला टीममध्ये आणलं. केकेआरसोबत खेळण्यासाठी मुझरबानी पीएसएल सोडून आला, पण पहिल्याच सामन्यात मुंबईचे ओपनर रोहित शर्मा-रियान रिकलटन यांनी त्याच्यावर आक्रमण केलं.
advertisement
6/9
मुंबईविरुद्धच्या सामन्यात ब्लेसिंग मुझरबानीने 3 ओव्हरमध्ये एकही विकेट न घेता 34 रन दिल्या. यानंतर हैदराबादविरुद्धच्या सामन्यात हेड आणि अभिषेकनेही मुझरबानीची धुलाई केली. मुझरबानीच्या पहिल्याच ओव्हरला हेड-अभिषेकने तब्बल 16 रन काढले, त्यानंतर रहाणेने मुझरबानीला पुढची ओव्हर दिली नाही.
advertisement
7/9
पॉवर प्ले संपल्यानंतर रहाणेने पुन्हा मुझरबानीला बॉलिंगसाठी आणलं आणि एकाच ओव्हरमध्ये मुझरबानीला 2 विकेट मिळाल्या, पण या दोन्ही विकेट मुझरबानीची बॉलिंग नाही तर केकेआरच्या फिल्डिंगमुळे आल्या.
advertisement
8/9
मुझरबानीने इशान किशनला शॉर्ट बॉल टाकला ज्यावर इशानने मोठा शॉट मारला, पण बाऊंड्री लाईनवर रिंकू सिंगने उत्कृष्ट कॅच पकडला. यानंतर त्याच ओव्हरमध्ये मुझरबानीच्या बॉलिंगवर वरुण चक्रवर्तीने अभिषेक शर्माचा जबरदस्त कॅच पकडला, पण हा कॅच वादात सापडला.
advertisement
9/9
वरुण चक्रवर्ती कॅच पकडत असताना बॉलचा स्पर्श जमिनीला झाल्याचं वाटत होतं, त्यामुळे मैदानातले अंपायर थर्ड अंपायरकडे गेले, अखेर थर्ड अंपायरने अभिषेकला आऊट दिलं. वरुणने पकडलेला हा कॅच नीट नसल्याच्या प्रतिक्रिया चाहते देत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : शेवटच्या क्षणाची डील शाहरुखला महागात, दुसऱ्याच सामन्यात रहाणेने डोक्याला हात लावला!