TRENDING:

Indian Railway : कधी वेटिंग लिस्ट 10 वर अडकते, तर कधी 100 ही कन्फर्म होतो, हे कसं होतं? रेल्वेचा हा फॉर्म्यूला माहितीय का?

Last Updated:
रेल्वेचं तिकीट कन्फर्म होणं हे केवळ नशिबावर नाही, तर रेल्वेच्या एका अत्यंत क्लिष्ट आणि तांत्रिक अल्गोरिदमवर अवलंबून असतं. रेल्वे नक्की कोणत्या प्रवाशाला आधी सीट देतं? 10 वेटिंग का अडकून राहतं आणि 100 वेटिंग कसं काय क्लिअर होतं?
advertisement
1/10
Indian Railway : कधी वेटिंग लिस्ट 10 वर अडकते, तर कधी 100 ही कन्फर्म होतो, हे कसं होतं? रेल्वेचा हा फॉर्म्यूला माहितीय का?
तुमच्यासोबत कधी असं घडलंय का? प्रवासाच्या महिनाभर आधी तिकीट काढलं, वेटिंग फक्त 5 किंवा 10 होतं, पण चार्ट लागेपर्यंत ते कन्फर्मच झालं नाही. दुसरीकडे, तुमचा एखादा मित्र सांगतो की त्याचं 70-80 वेटिंग होतं आणि तरीही त्याला कन्फर्म सीट मिळाली. अशा वेळी आपल्याला वाटतं की हे सर्व नशिबाचा खेळ आहे.
advertisement
2/10
पण रेल्वेचं तिकीट कन्फर्म होणं हे केवळ नशिबावर नाही, तर रेल्वेच्या एका अत्यंत क्लिष्ट आणि तांत्रिक अल्गोरिदमवर अवलंबून असतं. रेल्वे नक्की कोणत्या प्रवाशाला आधी सीट देतं? 10 वेटिंग का अडकून राहतं आणि 100 वेटिंग कसं काय क्लिअर होतं? या सर्व प्रश्नांची उत्तरं रेल्वेच्या कोटा आणि रूट सिस्टिममध्ये दडलेली आहेत. चला तर मग, रेल्वेचा हा कन्फर्मेशन फॉर्म्युला सोप्या भाषेत समजून घेऊया.
advertisement
3/10
रेल्वे फक्त सीट विकत नाही, तर रूट विकतेआपल्याला वाटतं की ट्रेनमध्ये 500 सीट्स आहेत, तर रेल्वे 500 तिकीटं कन्फर्म देईल आणि त्यानंतर वेटिंग सुरू करेल. पण प्रत्यक्षात असं नसतं. रेल्वे एकाच सीटचे अनेक तुकडे करून ती वेगवेगळ्या प्रवाशांना विकते.दिल्ली ते मुंबई जाणाऱ्या ट्रेनमध्ये एकच सीट दिल्ली ते जयपूर एकाला, जयपूर ते सुरत दुसऱ्याला आणि सुरत ते मुंबई तिसऱ्याला दिली जाऊ शकते. यामुळे रेल्वेचा महसूल वाढतो आणि जास्तीत जास्त प्रवाशांना प्रवास करता येतो. तुम्ही तिकीट कुठून बुक करत आहात आणि तिथे किती जागांचा कोटा आहे, यावर तुमचं तिकीट कन्फर्म होणार की नाही हे ठरतं.
advertisement
4/10
10 वेटिंग असूनही तिकीट का अडकतं?कधी कधी कमी वेटिंग असूनही तिकीट कन्फर्म होत नाही, याची मुख्य कारणं खालीलप्रमाणे आहेत.1. रूटची प्रचंड मागणी: दिल्ली-पाटणा किंवा मुंबई-वाराणसी सारख्या मार्गांवर लोक सहसा तिकीट कॅन्सल करत नाहीत. कॅन्सेलेशन कमी म्हणजे वेटिंग क्लिअर होण्याची शक्यताही कमी.
advertisement
5/10
2. कोटा ब्लॉक: रेल्वेमध्ये VIP, महिला, डिफेन्स आणि लोअर बर्थ असे विविध कोटे असतात. जर हे कोटे शेवटच्या क्षणापर्यंत भरलेले राहिले, तर सामान्य वेटिंग लिस्ट पुढे सरकत नाही.
advertisement
6/10
3. RLWL आणि PQWL चा अडथळा: *RLWL (Remote Location Waiting List): जर तुम्ही मधल्या एखाद्या स्टेशनवरून प्रवास सुरू करणार असाल, तर तुम्हाला हा कोटा मिळतो. यात जागा खूप कमी असतात, त्यामुळे 5 वेटिंग असूनही ते कन्फर्म होत नाही.
advertisement
7/10
PQWL (Pooled Quota Waiting List): दोन मधल्या स्टेशन्सच्या प्रवासासाठी हा कोटा असतो. यात अनेक स्टेशन्सचे प्रवासी एकाच छोट्या कोठ्यासाठी स्पर्धा करत असतात, त्यामुळे इथेही वेटिंग अडकण्याचे प्रमाण जास्त असते.
advertisement
8/10
100 वेटिंग कसं काय क्लिअर होतं?जेव्हा आपण मुख्य स्टेशनवरून (Source Station) शेवटच्या स्टेशनपर्यंत तिकीट बुक करतो, तेव्हा आपल्याला GNWL (General Waiting List) मिळते. या कोठ्यात सर्वाधिक जागा असतात.जर एखादी मोठी ग्रुप बुकिंग (उदा. लग्न किंवा सहल) कॅन्सल झाली, तर एका झटक्यात 50-60 वेटिंग क्लिअर होतं.तसेच चार्ट बनताना जर इतर स्पेशल कोटे रिकामे राहिले, तर त्या जागा जनरल वेटिंगवाल्यांना दिल्या जातात. यामुळेच 100 वेटिंग असलेले तिकीटही कधी कधी कन्फर्म होऊन जातं.
advertisement
9/10
प्रवाशांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स:1. GNWL ला प्राधान्य द्या: शक्य असल्यास मुख्य स्टेशनवरून तिकीट बुक करा, तिथे कन्फर्म होण्याची शक्यता जास्त असते.2. कॅन्सेलेशन पॅटर्न तपासा: सुट्ट्यांच्या काळात किंवा सणासुदीला वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याचं प्रमाण खूप कमी असतं.3. पर्यायी ट्रेन पहा: जर एखाद्या रूटवर जास्त ट्रेन्स असतील, तर तिथे वेटिंग लवकर क्लिअर होतं.
advertisement
10/10
रेल्वेचं वेटिंग सिस्टिम हे केवळ नंबरवर नाही, तर तुम्ही कुठून कुठे जाणार आहात आणि रेल्वेने त्या सेक्शनसाठी किती जागा ठेवल्या आहेत, यावर चालतं. त्यामुळे पुढच्या वेळी तिकीट काढताना फक्त वेटिंग नंबर न बघता, तो कोणत्या कॅटेगरीतला आहे (GNWL, RLWL की PQWL) हे नक्की तपासा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Indian Railway : कधी वेटिंग लिस्ट 10 वर अडकते, तर कधी 100 ही कन्फर्म होतो, हे कसं होतं? रेल्वेचा हा फॉर्म्यूला माहितीय का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल