TRENDING:

Weather Alert : महाराष्ट्रात 'तो'परतला, आता धो-धो बरसणार, 21 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
या भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असून अनेक भागांत वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाहुयात विभागानुसार हवामानाचा अंदाज
advertisement
1/7
महाराष्ट्रात 'तो'परतला, आता धो-धो बरसणार, 21 जिल्ह्यांना अलर्ट
मागील काही दिवसांपासून हवामानातील मोठे बदल पाहायला मिळत आहेत. 3 एप्रिल रोजी राज्यातील 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असून अनेक भागांत वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाहुयात विभागानुसार हवामानाचा अंदाज
advertisement
2/7
कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट देण्यात आलेला नसला तरी हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. काही भागांत वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. समुद्रकिनारी भागात वाऱ्याचा वेग वाढू शकतो.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे कोणताही अलर्ट नसला तरी काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रात जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर धुळे आणि नाशिक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत मेघगर्जनेसह पाऊस, तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
5/7
मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, बीड, जालना आणि संभाजीनगर या पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असून शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी.
advertisement
6/7
विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही भागांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांना कोणताही अधिकृत अलर्ट नसला तरी हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे अशी माहिती हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आली आहे.
advertisement
7/7
एकूणच राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण कायम असून वीज, वादळी वारे आणि गारपीट यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रात 'तो'परतला, आता धो-धो बरसणार, 21 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल