TRENDING:

पुणेकरांना 'त्या' दिवशीच्या भयानक घटनेची झाली आठवण, भलं मोठं होर्डिंग पात्यासारखा कोसळलं, घटनास्थळाचे PHOTOS

Last Updated:
मुसळधार पावसात पुण्यातील गंगाधाम चौकात होर्डिंग कोसळले आहे. या दुर्घटनेत कुणीही जखमी नसून होर्डिंगचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. (अभिजीत पोते, प्रतिनिधी)
advertisement
1/7
पुणेकरांना 'त्या' दिवशीच्या भयानक घटनेची झाली आठवण, भलं मोठं होर्डिंग पात्यासारखा कोसळलं, PHOTOS
राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. पुण्यामध्येही तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस बरसत आहे. या पावसामुळे अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
advertisement
2/7
मुसळधार पावसात पुण्यातील गंगाधाम चौकात होर्डिंग कोसळले आहे. या दुर्घटनेत कुणीही जखमी नसून होर्डिंगचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. मात्र, या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडमधील रावेत (किवळे) भागात एप्रिल 2023 मध्ये घडलेल्या भयानक घटनेची आठवण झाली. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला होता. सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे नागरिक एका पंक्चरच्या दुकानाचा आडोसा घेत असताना हे बेकायदा होर्डिंग त्यांच्यावर कोसळले होते. हे होर्डिंग अनधिकृत असल्याचे तपासात समोर आले होते.
advertisement
3/7
आज झालेल्या पावसाचा सर्वाधिक फटका शहरातील सखल भागांना बसला. खराडी, चंदननगर, कोंढवा, उत्तमनगर, दापोडी, सिंहगड रोड, कोथरूड परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही भागांत रस्ते पूर्णपणे जलमय झाल्याचे पाहायला मिळाले. पावसात जोरदार वारे असल्यामुळे गंगाधाम चौकातील भलं मोठं होर्डिंग पात्यासारखा कोसळले.
advertisement
4/7
या पावसामुळे अनेक वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी पाण्यात अडकून वाहने बंद पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
advertisement
5/7
दरम्यान, सिंहगड रोड परिसरात अवकाळी पावसात झाड कोसळले. या दुर्घटनेमध्ये रंजना नवनाथ गिरी महिलेचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
advertisement
6/7
तर शहरात पावसामुळे 82 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत 52 ठिकाणी अग्निशामक दलाला झाडे उचलण्यात यश आले आहे.
advertisement
7/7
इतर ठिकाणी अजूनही झाडे पडले असल्याने मोठी वाहतूक कोंडी पाहिला मिळत आहे. अनेक ठिकाणी वाहनांचे मोठं नुकसानही झाले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
पुणेकरांना 'त्या' दिवशीच्या भयानक घटनेची झाली आठवण, भलं मोठं होर्डिंग पात्यासारखा कोसळलं, घटनास्थळाचे PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल