TRENDING:

IPL सुरु असताना स्टार खेळाडूची रिटायरमेंट, क्रिकेट बोर्डाच्या 'त्या' निर्णयानंतर घेतला मोठा निर्णय

Last Updated:
एका स्टार खेळाडूने तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा फटका बसला आहे.
advertisement
1/9
IPL सुरु असताना स्टार खेळाडूची रिटायरमेंट, क्रिकेट बोर्डाच्या 'त्या' निर्णयानंतर घेतला मोठा निर्णय
आयपीएलमध्ये आज कोलकत्ता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना पार पडणार आहे. या सामन्याता थोड्याच वेळात सूरूवात होणार आहे.
advertisement
2/9
या सामन्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. एका स्टार खेळाडूने तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा फटका बसला आहे.
advertisement
3/9
या खेळाडूने आयपीएलमध्ये देखील अनेक सामने खेळले आहेत. मात्र या हंगामात त्याचे ऑक्शनमध्ये देखील नाव नव्हते. त्यात आता त्याने निवृत्ती घेतल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.
advertisement
4/9
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून रॅसी व्हॅन डर डुसेन असे आहे. तो साऊथ आफ्रिकेचा स्टार खेळाडू आहे. साऊथ आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर केल्यानंतर रासी वान डेर डुसेनने हा निर्णय घेतला होता.
advertisement
5/9
खरं तर साऊथ आफ्रिकेने त्यांच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट यादीतून डेविड मिलर आणि रॅसी व्हॅन डर डुसेन या दोन खेळाडूंच नाव काढून टाकलं होतं. त्यामुळेच त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.
advertisement
6/9
रॅसी व्हॅन डर डुसेन याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून निवृत्तीची घोषणा केली होती. माझ्या देशासाठी खेळणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे. हा प्रवास अनेक वर्षांच्या त्यागातून घडला आहे, पण दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्रत्येक क्षण मोलाची होती. मला प्रोटियाजची जर्सी घालण्याची संधी दिल्याबद्दल क्रिकेट दक्षिण आफ्रिका, एनॉक न्क्वे आणि गेल्या अनेक वर्षांपासूनचे सर्व प्रोटियाज प्रशिक्षक आणि व्यवस्थापक यांचे मनःपूर्वक आभार."
advertisement
7/9
रॅसी व्हॅन डर डुसेनने आपल्या पोस्टमध्ये पत्नीचा उल्लेख करत तिच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्याने लिहिले, "माझी पत्नी, लारा, तू प्रत्येक पावलावर माझ्यासोबत होतीस." तुम्ही अनेक चांगल्या आणि वाईट गोष्टींचा सामना करुणा, प्रेम आणि सामर्थ्याने केला आहे, आणि तुम्ही माझे सर्वात मोठे समर्थक आहात, ज्यांच्याशिवाय मी हे करू शकलो नसतो."
advertisement
8/9
दरम्यान 37 वर्षीय रॅसी व्हॅन डर डुसेनने दक्षिण आफ्रिकेसाठी 18 कसोटी,71 एकदिवसीय आणि 57 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, त्यात अनुक्रमे 905,2657 आणि 1406 धावा केल्या आहेत. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये सहा शतके झळकावली आहेत.
advertisement
9/9
रॅसी व्हॅन डर डुसेन हा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे. 2022 च्या हंगामात त्याने राजस्थानसाठी तीन सामने खेळले होते ,ज्यात त्याने 22 धावा केल्या होत्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL सुरु असताना स्टार खेळाडूची रिटायरमेंट, क्रिकेट बोर्डाच्या 'त्या' निर्णयानंतर घेतला मोठा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल