Dhurandhar नंतर फळफळलं राकेश बेदींचं नशीब, हाती लागले 2 बिग बजेट प्रोजेक्ट, 'या' स्टारसोबत करणार काम
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Rakesh Bedi Upcoming Projects: 'धुरंधर'च्या पहिल्या भागात नकारात्मक भूमिकेत दिसणाऱ्या राकेश बेदी यांनी दुसऱ्या भागात संपूर्ण गेमच पलटवला. त्यांच्या या धमाकेदार अभिनयामुळे प्रेक्षक त्यांच्या प्रेमात पडले आहेत. ७१ वर्षीय या अभिनेत्याने संपूर्ण देशात डंका वाजवला आहे.
advertisement
1/9

'धुरंधर २' ने २०२६ ची दणक्यात सुरुवात केली आहे. अवघ्या १४ दिवसांमध्ये या फिल्मने १४०० कोटींहून अधिक कमाई करत या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारी फिल्म ठरली आहे. रणवीर सिंग स्टारर 'धुरंधर'ची क्रेझ काही केल्या कमी होत नाही आहे.
advertisement
2/9
रणवीर सिंगसोबतच या फिल्ममध्ये आर माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन, राकेश बेदी यांनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या फिल्ममधील प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. मात्र, 'धुरंधर'नंतर या फिल्ममध्ये 'जमील जमाली' हे पात्र साकारणाऱ्या राकेश बेदी यांना लॉटरी लागली आहे.
advertisement
3/9
'धुरंधर'च्या पहिल्या भागात नकारात्मक भूमिकेत दिसणाऱ्या राकेश बेदी यांनी दुसऱ्या भागात संपूर्ण गेमच पलटवला. त्यांच्या या धमाकेदार अभिनयामुळे प्रेक्षक त्यांच्या प्रेमात पडले आहेत. ७१ वर्षीय या अभिनेत्याने संपूर्ण देशात डंका वाजवला आहे.
advertisement
4/9
नुकतंच राकेश बेदी महाकालचे दर्शन घेण्यासाठी उज्जैनला पोहोचले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी 'धुरंधर ३' च्या अफवांनाही पूर्णविराम लावला.
advertisement
5/9
राकेश बेदी म्हणाले, "'धुरंधर २' ही एक पूर्ण झालेली कथा आहे. आदित्य धर यांनी हा चित्रपट ज्या उंचीवर नेला, तिथून पुढे भाग ३ येण्याची शक्यता सध्या तरी नाही. 'धुरंधर ३' ची वाट पाहण्यात काही अर्थ नाही, कारण तसा कोणताही प्लॅन सध्या पाइपलाइनमध्ये नाही."
advertisement
6/9
राकेश बेदींनी 'जमील जमाली' या पात्राबद्दलच्या भावनाही व्यक्त केल्या. त्यांनी सांगितल्यानुसार, त्यांच्यासाठी हे पात्र अजिबात सोपे नव्हते. क्रिकेटचं उदाहरण देत त्यांनी सांगितलं, "जेव्हा विराट कोहली मैदानावर सिक्स मारतो, तेव्हा ते पाहायला खूप सोपं वाटतं, पण त्यामागे त्याची अफाट मेहनत असते. तसंच अभिनयाचं आहे."
advertisement
7/9
ते पुढे म्हणाले, "आदित्य धर यांनी मला पारंपरिक व्हिलन न बनवता एक चाणाक्ष खलनायक बनवलं. 'मेरा बच्चा है तू' हा डायलॉग प्रेक्षकांच्या लक्षात राहिला, यातच माझं यश आहे." त्यांनी रणवीर सिंगचंही कौतुक केलं आणि त्याला खऱ्या अर्थाने चित्रपटाचा 'धुरंधर' म्हटलं.
advertisement
8/9
दरम्यान, राकेश बेदी यांना 'धुरंधर' नंतर लॉटरी लागली असल्याचं म्हटलं, तरी आता वावगं ठरणार नाही. यावेळी त्यांनी त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दलही माहिती दिली.
advertisement
9/9
राकेश बेदी लवकरच 'है जवानी तो इश्क होना है' या वरुण धवनच्या आगामी चित्रपटातही एका हटके अंदाजात दिसतील. तर प्राइम व्हिडिओवर येणाऱ्या 'राख' या हाय-व्होल्टेज वेब सीरिजमध्ये राकेश बेदी एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. दोन्ही प्रोजेक्ट्सचं शूटिंग जवळपास पूर्ण झालं असून लवकरच प्रदर्शनाची तारीख जाहीर होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dhurandhar नंतर फळफळलं राकेश बेदींचं नशीब, हाती लागले 2 बिग बजेट प्रोजेक्ट, 'या' स्टारसोबत करणार काम