Redmi Note 15 SE 5G फोन लॉन्च! डिस्प्ले, बॅटरी सर्वच आहे दमदार; किंमत किती?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Redmi Smartphone under 25000: तुम्हाला 25 हजार रुपयांहून कमी बजेटमध्ये भारी फोन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला बेस्ट ऑप्शनविषयी आम्ही सांगणार आहोत. नुकताच Note 15 SE 5G लॉन्च झालाय. चला या फोनचे डिटेल्स जाणून घेऊया.
advertisement
1/7

Redmi Note 15 SE 5G हा फोन नुकताच भारतात लॉन्च करण्यात आला. हा फोनमध्ये Redmi Note 15 5G चा स्पेशल एडिशन फोन आहे. तीन कलर ऑप्शन्स आणि तीन स्टोरेज ऑप्शन्समध्ये आलेल्या या फोनमध्ये Snapdragon 6 Gen 3 चिपसेट आणि ड्यूअल रियर कॅमेरा सेटअप आहे. चला या फोनची प्राइज, फीचर्स आणि सेल कधी सुरू होणार याविषयी जाणून घेऊया.
advertisement
2/7
भारतीय बाजारात या हँडसेटच्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 19 हजार 999 रुपये आहे. 8 जीबी रॅम आणि 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 21999 रुपये, 8 जीबी रॅम आणि 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 23999 रुपये आहे.
advertisement
3/7
निवडक बँक कार्ड्सवर 2 हजार रुपयांचं बँक कार्ड डिस्काउंटचा फायदा मिळेल. फोनची विक्री ही 7 एप्रिलपासून फ्लिपकार्ट आणि Xiaomi ऑनलाइ स्टोअरवर सुरू होईल. हा फोन कार्बन ब्लॅक, क्रिमसन रिजर्व्ह आणि फ्रॉस्टेड व्हाइट कलरमध्ये उपलब्ध असेल. या फोनची टक्कर vivo T5x 5G, MOTOROLA Edge 60 Fusion 5G आणि REDMI Note 15 5G सारख्या मॉडल्ससोबत असणार आहे.
advertisement
4/7
फोनमध्ये 6.7 इंच कर्व्ड एमोलेड डिस्प्ले आहे. हा फोन 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट, 3200 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेससह येतो. हा फोन 4nm वर बेस्ड Snapdragon 6 Gen 3 ऑक्टा कोर प्रोसेसरवर काम करतो.
advertisement
5/7
हा फोन ड्यूअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा सेन्सर, सोबत 2 मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा सेन्सरसह येतो. सेल्फीसाठी यात 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिलाय. हा कॅमेरा 4K/30 fps वर व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो.
advertisement
6/7
या फोनमध्ये 5800 ची दमदार बॅटरी दिलीये. जी 45 वॉट वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये ड्यूअल वाय-फाय, 4जी एलटीई, ब्लूटूथ व्हर्जन 5.1, यूएसबी टाइप सी पोर्ट, जीपीएससारखे फीचर्स मिळतात. सिक्योरिटीसाठी अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो.
advertisement
7/7
ड्यूअल सिम असणारा हा फोन Android 15 वर आधारित HyperOS 2 वर काम करतो. कंपनीचा दावा आहे की, फोन डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंससाठी IP65 + IP66 रेटिंगसह येतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Redmi Note 15 SE 5G फोन लॉन्च! डिस्प्ले, बॅटरी सर्वच आहे दमदार; किंमत किती?