TRENDING:

Friday Releases : सस्पेंन्स-एक्शनने भरलाय April चा पहिला शुक्रवार, OTT अन् थिएटरमध्ये 7 फिल्म-वेब सीरिजचा तडका

Last Updated:
Friday Releases : एप्रिल महिना सुरू झालाय. बऱ्यापैकी रिलॅक्स आणि चील करण्याचा हा महिना आहे. या महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी ओटीटी आणि थिएटरमध्ये जबरदस्त फिल्म आणि वेब सीरिजचा तडका पाहायला मिळणार आहे. कोणत्या आहेत त्या पाहूयात.
advertisement
1/7
 सस्पेंन्स-एक्शनने भरलाय April चा पहिला शुक्रवार,  OTT अन् थिएटरमध्ये 7 फिल्म-वेब सीरिजचा तडका
मा का सम - ही 8 एपिसोडची मॅथेमॅटिकल ड्रामा असलेली वेब सीरिज आहे. 19 वर्षांच्या अगस्त्य नावाच्या मुलाची कथा दाखवण्यात आली आहे. तो आयुष्याकडे गणिताच्या अल्गोरिदमसारखं पाहतो. त्याला वाटतं की माणसांच्या भावना कोणतीही गणिती समस्या सोडवू शकतात. याच विचारातून तो 'प्रोजेक्ट मॉम' तयार करतो. या सीरिजमध्ये मोना सिंग आणि मिहिर आहुजा मुख्य भूमिकेत आहेत. 3 एप्रिलला ही सीरिज अमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज होणार आहे.
advertisement
2/7
सितारे जमीन पर - आमिर खानचा 2025 मध्ये रिलीज झालेली स्पोर्ट्स ड्रामा फिल्म 'सितारे जमीन पर' आता 3 एप्रिलला ओटीटीवर रिलीज होतोय. Sony LIV हा सिनेमा तुम्ही पाहू शकता. आमिर खानसोबत जेनेलिया डिसूजा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
advertisement
3/7
भाबीजी घर पर हैं - फन ऑन द रन विभूती नारायण मिश्रा आणि मनमोहन तिवारी यांची मजेशीर नोकझोंक आता ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात आसिफ शेख, रोहिताश्व गौर, शुभांगी अत्रे आणि विदिशा श्रीवास्तव त्यांच्या लोकप्रिय भूमिकांमध्ये दिसतील. 3 एप्रिलपासून ZEE5 वर हा सिनेमा पाहू शकता.
advertisement
4/7
मामला लीगल है 2 - कोर्टरूम कॉमेडी ड्रामा- पहिल्या सिझननंतर मोठी लोकप्रियता मिळाल्यानंतर रवि किशन पुन्हा 'वीडी त्यागी' च्या भूमिकेत परत आले आहेत. नव्या सिझनमध्ये 'जुगाड' वापरून केस मिळवणाऱ्या वकिलाची जज होण्याची इच्छा दाखवण्यात येणार आहे. 3 एप्रिलपासून ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर पाहायला मिळेलं.
advertisement
5/7
वध 2 - संजय मिश्रा आणि नीना गुप्ता पुन्हा एकदा वध 2 ही थरारक कथा घेऊन येत आहेत. हा 2022 मधील 'वध' सिनेमाचा सिक्वेल आहे. 3 एप्रिलला नेटफ्लिक्वर रिलीज होणार आहे.
advertisement
6/7
मृत्युंजय - क्राइम थ्रिलर - श्री विष्णू आणि रेबा मोनिका जॉन यांच्या मुख्य भूमिकेतील हा तेलुगू क्राइम थ्रिलर आहे. यात एका पत्रकाराची कथा आहे जी अनेक रहस्यमय मृत्यूंच्या प्रकरणांचा तपास करते. सुरुवातीला साधा वाटणारा हा तपास पुढे जाऊन धोकादायक वळण घेतो. ही नेटफ्लिकवर पाहायला मिळेल.
advertisement
7/7
'चिरंजीवी हनुमान: द इटरनल' हा एक मायथॉलॉजिकल सिनेमा आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण चित्रपट AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) च्या मदतीने तयार करण्यात आला आहे. हा चित्रपट हनुमान जयंतीच्या निमित्ताने 2 एप्रिलला थिएटर्समध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश मापुस्कर यांनी केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Friday Releases : सस्पेंन्स-एक्शनने भरलाय April चा पहिला शुक्रवार, OTT अन् थिएटरमध्ये 7 फिल्म-वेब सीरिजचा तडका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल