TRENDING:

लाडकी बहीण योजनेवर मोठी अपडेट! महिलांमध्ये आनंदाचं वातावरण, पाहा काय म्हणाल्या अदिती तटकरे

Last Updated:
Ladki Bahin Yojana latest Update: राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजना चालवली जाते. आता या योजनेविषयी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ज्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
advertisement
1/7
लाडकी बहीण योजनेवर मोठी अपडेट! महिलांमध्ये आनंदाचं वातावरण, पाहा काय म्हणाल्या अदिती तटकरे
Ladki Bahin Yojana eKYC update : महाराष्ट्रात चालवली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी महतत्वाची अपडेट समोर आली आहे. आता लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी दुरुस्तीची मुदत ही 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवलीये. ज्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालाय.
advertisement
2/7
ज्या महिला 31 मार्चपूर्वी केवायसी दुरुस्ती करू शकलेल्या नाहीत. त्यांना याचा मोठा फायदा झालाय. राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी याविषयी माहिती दिली आहे.
advertisement
3/7
बुधवारी राज्यमंत्री मंडळाची बैठक पार पडली. यानंतर कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेची मुदत वाढवण्यात आली असल्याची माहिती दिलीये. ज्यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
advertisement
4/7
पण का दिली जातेय मुदतवाढ? : अदिती तटकरे यांनी या केवायसी मुदतवाढीविषयी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. त्या म्हणाल्या की, ई-केवायसी सुधारणा करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र राज्यात अवकाळी पावसाचे संकट आले, गारपीटचा इशारा देण्यात आला. यासोबत राज्यातील लाडक्या बहिणींनी केलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सूचना दिल्यानंतर ई-केवायसी दुरुस्तीची मुद ही 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
advertisement
5/7
अदिती तटकरे यांनी ही अंतिम मुदत दिली जात असल्याचं सांगितलंय. ज्यामुळे सर्व महिलांनी या मुदतीआधी ई-केवायसी करावी असे अवाहन केलेय. केवायसी दुरुस्ती न केल्यास संबंधित महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
advertisement
6/7
ई-केवायसी का करायचीये : लाडकी बहीण योजना ही अधिक पारदर्शक व्हावी म्हणून सरकारने ई-केवायसी अनिवार्य केली होती. बोगस लाभार्थी आणि अपात्र महिलांना गाळण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या काही महिन्यांपासून केवायसी सुरू आहे. ज्या महिला यात अपात्र ठरल्या त्यांना आता लाभार्थ्यांच्या यादीतून वगळण्यात आलंय. ज्यामुळे सरकारवरील अतिरिक्त भार कमी होणार आहे.
advertisement
7/7
सप्टेंबर 2025 पासून ई-केवायसी सुरू झाली. सुरुवातीला फक्त 2 महिने मुदत दिली होती. मात्र नंतर ती मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली. यामध्ये काही महिलांनी चुकीचे पर्याय निवडले. तर काहींनी ई-केवायसी केली तरीही त्यांना योजनेचा लाभ मिळणं थांबलं. तात्रिक कारणांमुळे कोणालाही नुकसान होऊ नये असा सरकारचा हेतू होता. याच कारणामुळे ई-केवायसी दुरुस्ती करण्याची संधी देण्यात आली. आता 30 एप्रिलही अखेरची मुदत दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
लाडकी बहीण योजनेवर मोठी अपडेट! महिलांमध्ये आनंदाचं वातावरण, पाहा काय म्हणाल्या अदिती तटकरे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल