TRENDING:

Pune Accident: कात्रजच्या नव्या बोगद्याजवळ भीषण अपघात; एका ट्रेलरची दुसऱ्या ट्रेलरला धडक, क्रेनचा पार्ट थेट केबिनमध्ये

Last Updated:
Katraj Tunnel Accident: नवीन बोगद्यापासून नवले पुलाच्या दिशेने जाणाऱ्या तीव्र उतारावर पाठीमागून येणाऱ्या ट्रेलरच्या चालकाचे नियंत्रण सुटले.(अभिजीत पोते, प्रतिनिधी)
advertisement
1/7
Pune Accident: कात्रजच्या नव्या बोगद्याजवळ भीषण अपघात; एका ट्रेलरची दुसऱ्या ट्रेलरला धडक, क्रेनचा पार्ट थेट केबिनमध्ये
पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील कात्रज नवीन बोगद्याजवळ असलेल्या जांभुळवाडी दरी पुलावर आज एका भीषण अपघाताची घटना घडली. दोन ट्रेलरची एकमेकांना धडक बसल्याने झालेल्या या अपघातात चालक आणि क्लिनर जखमी झाले असून वाहनाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
advertisement
2/7
समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही ट्रेलर हे क्रेनचे अवजड भाग (पार्ट्स) घेऊन जात होते. कात्रज नवीन बोगद्यापासून नवले पुलाच्या दिशेने जाणाऱ्या तीव्र उतारावर पाठीमागून येणाऱ्या ट्रेलरच्या चालकाचे नियंत्रण सुटले. वेग अधिक असल्याने या ट्रेलरने पुढच्या ट्रेलरला जोरात धडक दिली.
advertisement
3/7
ही धडक इतकी भीषण होती की पाठीमागच्या ट्रेलरवर असलेला क्रेनचा जड लोखंडी भाग वेगामुळे सरकून थेट चालकाच्या केबिनमध्ये घुसला. यामुळे केबिनचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
advertisement
4/7
कात्रज बोगदा ते नवले पूल हा परिसर 'ब्लॅक स्पॉट' म्हणून ओळखला जातो. येथील तीव्र उतारावर अनेकदा वाहनांचे ब्रेक निकामी होतात किंवा नियंत्रण सुटते. दोन्ही वाहनांमध्ये क्रेनचे वजनदार सुटे भाग असल्याने वेगावर नियंत्रण मिळवणे कठीण झाले असावे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
advertisement
5/7
या अपघातात चालक आणि क्लिनर दोघेही जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
advertisement
6/7
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त ट्रेलर बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.
advertisement
7/7
उतारावर वाहन चालवताना वेग मर्यादित ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Accident: कात्रजच्या नव्या बोगद्याजवळ भीषण अपघात; एका ट्रेलरची दुसऱ्या ट्रेलरला धडक, क्रेनचा पार्ट थेट केबिनमध्ये
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल