'प्रसाद ओकसोबतचे इंटिमेट सीन बघून माझी आई...', मराठी अभिनेत्रीने पहिल्यांदाच सांगितलं पडद्यामागचं सत्य
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
अवघाची हा संसार या मालिकेतील श्वेता आणि प्रसादचे सीन्स प्रचंड गाजले, पण ते सीन्स पाहून तिच्या आईची अवस्था वाईट झाली होती.
advertisement
1/13

जसजसा काळ पुढे जात आहे, तसतशी प्रेक्षकांची मानसिकताही बदलत जात आहे. पूर्वीच्या काळात सिनेमा किंवा मालिकांमध्ये खलनायकांचं पात्र साकारणारा कलाकार खऱ्या आयुष्यातही वाईटच आहे, असा प्रेक्षकांचा समज असायचा. मात्र, काळाच्या ओघात आता प्रेक्षकांमधील जाणतेपणा वाढताना दिसत आहे.
advertisement
2/13
मराठी सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला अनेक हिट मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र, करिअरच्या सुरुवातीला हिट ठरलेले कलाकार, हळूहळू इंडस्ट्रीतून गायब झाल्याचं पाहायला मिळालं.
advertisement
3/13
काही कलाकार इंडस्ट्रीपासून दुरावले, तर काहींनी पडद्यामागून सूत्र हलवून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. मराठी कलाविश्वातील असंच एक मोठं नाव म्हणजे अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदे. श्वेताने चार दिवस सासूचे, अवघाची हा संसार, गदर अशा मालिका आणि हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
advertisement
4/13
श्वेता सध्या पडद्यावर दिसत नसली, तरी ती निर्माती म्हणून अनेक हिट मालिका प्रेक्षकांसाठी तयार करत आहे. 'लागिरं झालं जी' पासून 'देवमाणूस'पर्यंत एकापेक्षा एक हिट मालिका तिने प्रेक्षकांना दिल्या आहेत.
advertisement
5/13
नुकतंच श्वेताने अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या पॉडकास्टला हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. मात्र, तिने केलेल्या एका बोल्ड खुलाशामुळे प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
advertisement
6/13
अवघाची हा संसार या मालिकेत श्वेताने नकारात्मक भूमिका साकारली होती. या मालिकेत तिने अभिनेता प्रसाद ओकसोबत अनेक हॉट सीन्स दिले होते. त्या काळात मालिकेत दाखवलेले हे सीन्स तुफान गाजले. अशातच, नव्या मुलाखतीमध्ये श्वेताने या बोल्ड इंटीमेट सीन्सवर आणि त्यावर तिच्या आईने दिलेल्या प्रतिक्रियेवर भाष्य केलं आहे.
advertisement
7/13
अवघाची हा संसार या मालिकेतील श्वेता आणि प्रसादचे सीन्स प्रचंड गाजले, पण ते सीन्स पाहून तिच्या आईची अवस्था वाईट झाली होती. दरम्यान, श्वेताने या सीन्समागचा खरा स्ट्रगल आणि पडद्यामागच्या गमतीजमती उघड केल्या आहेत.
advertisement
8/13
याबद्दल बोलताना श्वेता म्हणाली, "बापरे! त्याकाळी टेलिव्हिजनवर एवढे हॉट आणि स्टीमी सीन्स देणं हे खरंच मोठं धाडस होतं. पण, याचं सगळं श्रेय मी दोन पुरुषांना देईन, एक म्हणजे माझा को-स्टार प्रसाद ओक आणि दुसरे म्हणजे दिग्दर्शक मंदार देवस्थळी. जोपर्यंत दिग्दर्शक आणि अभिनेता तुम्हाला कम्फर्टेबल करत नाहीत, तोपर्यंत असे सीन्स पडद्यावर जिवंत वाटत नाहीत."
advertisement
9/13
पडद्यावर हे सीन्स जितके सहज आणि रोमँटिक वाटतात, मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती पूर्णपणे वेगळी असायची. श्वेताने सांगितलं, "एका छोट्याशा कोपऱ्यात आम्हाला उभं राहावं लागायचं. लोक विचार करायचे की आमच्यामध्ये काय चाललं असेल, पण खरा स्ट्रगल तर आमचा आम्हालाच माहीत होता. कसं उभं राहायचं, कॅमेरा अँगल कसा असेल, यात आमची कसरत व्हायची. पण, आम्ही ते सीन्स खूप एन्जॉय केले आणि प्रेक्षकांनीही ते स्वीकारले."
advertisement
10/13
मात्र, आपल्या लेकीला पडद्यावर असे सीन्स करताना पाहून, श्वेताच्या आईच्या मनाची घालमेल व्हायची. श्वेताने सांगितलं की, तिची आई ते सीन्स बघून अक्षरशः डिप्रेशनमध्ये जायची. तिला वाटायचं, लोक काय म्हणतील? माझ्या मुलीशी कोण लग्न करेल? त्यांनी तर श्वेताला असे सीन्स करू नको, असंही सांगितलं होतं. तिला खूप भीती वाटायची, पण, श्वेताने आईच्या बोलण्याकडे लक्ष न देता आपल्या कामावर लक्ष दिलं.
advertisement
11/13
प्रेक्षकांबद्दल श्वेता म्हणाली की, मराठी प्रेक्षक आता प्रगल्भ झाले आहेत. ते अन्य भाषेतील आणि देशातील सिनेमे पाहतात, त्यामुळे अशा सीन्सकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलला आहे.
advertisement
12/13
या मालिकेतील श्वेताचा लूक खूपच गाजला. तिने सांगितलं, "ते खास डिझायनर ब्लाऊज आणि प्लेन साड्यांची फॅशन मीच सुरू केली होती. आजही लोक त्या लूकची आठवण काढतात."
advertisement
13/13
श्वेता आता पडद्यावर फारशी सक्रिय नसली, तरीही, 'वज्र प्रॉडक्शन'च्या माध्यमातून ती नवनवीन प्रयोग करत आहे. तिने बनवलेल्या अनेक मालिकांनी मराठी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवलं असून, ती मराठी इंडस्ट्रीतील आघाडीची निर्माती बनली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'प्रसाद ओकसोबतचे इंटिमेट सीन बघून माझी आई...', मराठी अभिनेत्रीने पहिल्यांदाच सांगितलं पडद्यामागचं सत्य