तुमच्या TVचा रिमोट प्रशासनाच्या हाती! 2 तास पाहताच येणार नाही, या वेळेत राहणार बंद; कारण काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
TV : आता दिवसातील काही तास तुमच्या घरातील टीव्ही पूर्णपणे बंद राहणार आहे. प्रशासनाने तसा निर्णय घेतला आहे. यामागे एक खास कारण आहे.
advertisement
1/5

आजकाल मोबाईलनंतर टीव्ही अनेकांसाठी महत्त्वाची झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण मोबाईलनंतर कोणत्या गोष्टीचा सर्वाधिक वापर होत असेल तर तो म्हणजे टीव्ही. मनोरंजनाचं माध्यम. कित्येकांच्या घरात तर दिवसभर आणि रात्री उशिराही टीव्ही चालू असतो.
advertisement
2/5
पण आता एका विशिष्ट वेळेत तुम्हाला टीव्ही पाहता येणार नाही, दिवसातील 2 तास टीव्ही बंद राहणार आहे. तोही प्रत्येकाच्या घरातील. कारण तुमच्या घरातील टीव्हीचा रिमोट आता प्रशासनाच्या हाती आहे.
advertisement
3/5
धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागात सायंकाळी 7 ते 9 या वेळेत टीव्ही पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.
advertisement
4/5
यामागे खास कारण आहे, मोबाईल आणि टीव्ही यामुळे मुलांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. ते रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
5/5
या दोन तासांचा उपयोग मुलांनी फक्त अभ्यासासाठीच करावा, असा यामागील मुख्य उद्देश असल्याचं जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अर्चना पाटील यांनी सांगितल्याचं वृत्त आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
तुमच्या TVचा रिमोट प्रशासनाच्या हाती! 2 तास पाहताच येणार नाही, या वेळेत राहणार बंद; कारण काय?