या प्रकरणात पवन ज्ञानेश्वर झळके (वय 30) आणि अक्षय कैलास झळके (वय 22) या दोघांना वळदगाव परिसरातून अटक करण्यात आली. याबाबत माहिती निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली. तर युवराज ऊर्फ पंड्या मेहेर हा आरोपी अद्याप फरार आहे. सागर प्रकाश सरदार (वय 32, रा. वेदांतनगर) यांनी याबाबत तक्रार नोंदवली होती.
समाजाला धडे द्यायचा, तोच निघाला व्हिलन; मृदंगाचार्याचं काळं कांड कळालं, पत्नीनं स्वत:लाच संपवलं!
advertisement
सागर सरदार यांना जेवणाच्या ऑर्डरच्या निमित्ताने बोलावले आणि नंतर त्यांच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून लाकडी दांड्याने मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्याच्या बाळ्या, मोबाईल फोन आणि रोख 55,900 रुपये असा ऐवज चोरून नेला होता. या प्रकारानंतर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या गुन्ह्याचा तपास करताना उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे, गोविंद एकीलवाले, पोलीस हवालदार दिगंबर राठोड, संदीप चिंचोले आणि पोलीस कर्मचारी दिनेश भुरेवाल यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली. आरोपींकडून सुमारे 50 हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, जलद पैसा मिळवण्याच्या हेतूने आरोपींनी हा कट रचला होता. शहराजवळील गोलवाडी फाटा आणि लिंक रोड परिसर रात्रीच्या वेळी ओसाड असल्यामुळे त्यांनी हा भाग लुटीसाठी निवडला होता. मात्र, पहिल्याच प्रयत्नात ही टोळी सातारा पोलिसांच्या तावडीत सापडली.






