TRENDING:

सांगा जगायचं कसं? सव्वालाख खर्चून कांदा शेती, फक्त 8 हजार रुपये आले हाती, शेतकऱ्यानं हिशोबच मांडला

Last Updated:
Onion Rate: ही अवस्था केवळ एका शेतकऱ्याची नसून अनेक कांदा उत्पादक शेतकरी याच संकटाला सामोरे जात आहेत.
advertisement
1/7
जगायचं कसं? सव्वालाख खर्चून कांदा शेती, फक्त 8 हजार रुपये हाती, हिशोबच मांडला
खर्चाचा डोंगर उभा करून मेहनतीने पिकवलेला कांदा कवडीमोल दराने गेल्याने शेतकरी पुरता कोलमडला आहे. धाराशिवमधील शेतकरी तुकाराम शिंदे यांनी 1 लाख 37 हजारांचा खर्च करून कांदा पिकवला. परंतु, त्यांच्या हातात अवघे 8 हजार 700 रुपये आले. त्यामुळे मोठा आर्थिक फटका त्यांना सहन करावा लागला असून उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
advertisement
2/7
तुळशीराम शिंदे यांनी मोठ्या अपेक्षेने कांद्याची लागवड केली होती. रोपांची खरेदी, लागवड, खते, फवारणी, खुरपणी, काढणी यासाठी त्यांनी स्वतःची साठवलेली पुंजी खर्च केली, तसेच खासगी सावकाराकडून कर्जही घेतले. पिकाची वाढ चांगली होत असल्याने यंदा किमान खर्च निघेल आणि काही प्रमाणात कर्ज फेडता येईल, अशी त्यांची धारणा होती. मात्र प्रत्यक्ष बाजारपेठेत चित्र पूर्णपणे वेगळे पाहायला मिळाले.
advertisement
3/7
शेतकरी शिंदे यांना कांदा शेतीसाठी 1 लाख 37 हजार रुपये खर्च आला. यामध्ये 30 हजार रुपयांचे कांद्याचे रोप, लागवडीसाठी 27 हजार, खत 17 हजार, फवारणी 13 हजार, खुरपणी 18 हजार, काढणी 32 हजार रुपये असे 1लाख 37 हजार रुपये खर्च झाले. त्यानंतर कांदा हैदराबाद बाजारात पाठवण्यात आला.
advertisement
4/7
शिंदे यांनी आपला कांदा चांगल्या दराच्या अपेक्षेने हैदराबाद येथील बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवला. तेथे झालेल्या लिलावात त्यांच्या नावावर असलेल्या कांद्याची एकूण पट्टी सुमारे सतरा हजार पाचशे रुपयांपर्यंतच मर्यादित राहिली. त्यातून गाडी भाडे, हमाली आणि इतर खर्च वजा गेल्यानंतर प्रत्यक्ष हातात येणारी रक्कम केवळ 8 हजार 700 रुपयांवर येऊन ठेपली. उत्पादन खर्चाच्या तुलनेत ही रक्कम अत्यंत तुटपुंजी असल्याने नुकसान स्पष्टपणे दिसून येते.
advertisement
5/7
कांदा विक्रीदरम्यान वेगवेगळ्या गट्ट्यांना अत्यल्प दर मिळाल्याचेही समोर आले आहे. काही गट्ट्यांना केवळ दोन ते तीन रुपये प्रति किलो दर मिळाला, तर काहींना सहा ते नऊ रुपयांपर्यंत भाव मिळाला. मात्र सरासरी दर इतका कमी होता की एकूण उत्पन्न वाढू शकले नाही. वाहतूक खर्चाचाच मोठा हिस्सा उत्पन्नात गेला आणि शिल्लक रक्कम शेतकऱ्याच्या पदरी पडली.
advertisement
6/7
दरम्यान, ही अवस्था केवळ एका शेतकऱ्याची नसून लोहारा तालुक्यातील अनेक कांदा उत्पादक शेतकरी याच संकटाला सामोरे जात आहेत. वाढता उत्पादन खर्च, अनिश्चित बाजारभाव आणि वाहतुकीवरील मोठा खर्च यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहेत.
advertisement
7/7
कांद्याला किमान हमीभाव मिळावा, तसेच दूरच्या बाजारपेठेत माल नेण्यासाठी वाहतूक अनुदान द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा मेहनतीच्या शेतीतून शेतकऱ्याला तोटा सहन करावा लागणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
सांगा जगायचं कसं? सव्वालाख खर्चून कांदा शेती, फक्त 8 हजार रुपये आले हाती, शेतकऱ्यानं हिशोबच मांडला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल