TRENDING:

६ वाजून ४६ मिनिटांनी चंद्रग्रहण संपताच उतावळेपणात या चूका अजिबात करू नका! अन्यथा लागणार 'महापाप'

Last Updated:

Chandra Grahan 2026 : आज, ३ मार्च २०२६ रोजी होणारे चंद्रग्रहण देशातील बहुतांश भागांत पाहता येणार असल्याने धार्मिक परंपरेनुसार सूतक पाळले जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आज, ३ मार्च २०२६ रोजी होणारे चंद्रग्रहण देशातील बहुतांश भागांत पाहता येणार असल्याने धार्मिक परंपरेनुसार सूतक पाळले जात आहे. दुपारी ३ वाजून २१ मिनिटांपासून सुरू होणारे हे ग्रहण सायंकाळी ६ वाजून ४६ मिनिटांपर्यंत चालणार आहे. संध्याकाळी सुमारे ५ वाजून ५९ मिनिटांनंतर अनेक शहरांत चंद्रावर पडणारी पृथ्वीची सावली स्पष्ट दिसू लागेल.
Chandra Grahan 2026
Chandra Grahan 2026
advertisement

सूतक काळ सुरू झाला

परंपरेनुसार सूतक हा ग्रहणाच्या नऊ तास आधी सुरू होतो. त्यामुळे सकाळी ६ वाजून २० मिनिटांपासून सूतक लागू झाला आहे. धार्मिक श्रद्धा पाळणारे भाविक या काळात काही आचारसंहितेचे पालन करतात.

सूतक काळातील आचारसंहिता

धार्मिक मान्यतेनुसार सूतक काळात शक्यतो घरातच राहावे, देवतांचे नामस्मरण करावे आणि मानसिक जप करावा. अनेक कुटुंबांत अन्नपदार्थ झाकून ठेवणे, शिजवलेल्या अन्नात तुळशीची पाने टाकणे आणि मंदिरांचे दरवाजे बंद ठेवणे अशी पद्धत आहे.

advertisement

या काळात नवीन अन्न शिजवणे किंवा सेवन करणे टाळावे, अशी परंपरा सांगते. तसेच अनावश्यक वादविवाद, भांडणे, प्रवास किंवा महत्त्वाचे व्यवहार पुढे ढकलावेत, असेही मानले जाते. गर्भवती महिला, लहान मुले आणि वृद्धांनी विशेष काळजी घ्यावी, अशी समजूत आहे.

ग्रहण संपल्यानंतर काय करावे?

चंद्रग्रहण समाप्त झाल्यानंतर त्वरित स्नान करणे आणि घरात स्वच्छता राखणे योग्य मानले जाते. काही जण गंगाजल किंवा स्वच्छ पाणी शिंपडून वातावरण शुद्ध करण्याची प्रथा पाळतात. स्नानानंतर देवतांचे स्मरण करूनच दैनंदिन कामकाज सुरू करावे, असे धर्मग्रंथात नमूद आहे.

advertisement

काय करू नये?

ग्रहण संपताच लगेच झोपणे, मोठे निर्णय घेणे किंवा वाद निर्माण करणे टाळावे, अशीही परंपरागत सूचना आहे. पूजा साहित्याला किंवा नैवेद्याला स्पर्श करण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक मानले जाते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
150 वर्षांची परंपरा, सर्वात स्वस्त बांगड्यांची लेन,पुण्यातील हे ठिकाण माहितीये?
सर्व पहा

(सदर बातमी फक्त माहितीकरीता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)

मराठी बातम्या/अध्यात्म/
६ वाजून ४६ मिनिटांनी चंद्रग्रहण संपताच उतावळेपणात या चूका अजिबात करू नका! अन्यथा लागणार 'महापाप'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल