बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत, एलनाजने स्पष्ट केलं की तिचा निषेध इराणच्या लोकांविरुद्ध नाही तर तिथल्या इस्लामिक रिपब्लिक राजवटीविरोधात आहे. ती म्हणाली, "जेव्हा आपण इराणबद्दल बोलतो तेव्हा मी इस्लामिक रिपब्लिक आणि इराणच्या लोकांमध्ये फरक करू इच्छिते. इस्लामिक रिपब्लिकने देशावर कब्जा केला आहे. बहुतेक इराणी लोक हुशार आणि सुशिक्षित आहेत आणि त्यांचे विश्वास इस्लामिक रिपब्लिकच्या श्रद्धांपेक्षा वेगळा आहे." एकेकाळी इराणचे इस्रायल आणि अमेरिकेशी चांगले संबंध होते, असंही तिने सांगितलं.
advertisement
एलनाज नोरोझी कोण आहे?
इराणमध्ये जन्मलेली एलनाज वयाच्या ८ व्या वर्षी तिच्या कुटुंबासह जर्मनीला गेली. वयाच्या २० व्या वर्षी ती भारतात आली आणि चित्रपटसृष्टीचा भाग बनली. तिने स्पष्ट केलं की ती गेल्या एक दशकाहून अधिक काळापासून इराणला गेली नाही. आता ती परत जाऊ शकत नाही. ती म्हणाली की, मी इराणमध्ये पाऊल ठेवू शकत नाही. जर मी असं केलं तर मला भीती वाटते की ते मला मारून टाकतील. २०२२ च्या निदर्शनांदरम्यान झालेल्या घटनेमुळे मी इराणला जाऊ शकली नाही, जेव्हा त्यांनी महसा अमिनीची हत्या केली." तिने स्पष्ट केले की ती दशकांपासून इराणी राजवटीच्या धोरणांमुळे होणाऱ्या दडपशाहीविरुद्ध निषेध करत होती आणि तिचे विधान केवळ राजवटीविरुद्ध असहमती व्यक्त करण्यासाठी होते, लोकांच्या संस्कृती किंवा देशाविरुद्ध द्वेष पसरवण्यासाठी नव्हते.
एलनाजची चित्रपट कारकीर्द
एलनाजने २०१७ मध्ये एका पाकिस्तानी चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. २०१८-१९ मध्ये तिने "सेक्रेड गेम्स" च्या दोन सीझनमध्ये झोयाची भूमिका केली होती, ज्यामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ती "अभय", "मेड इन हेवन", "जुग जुग जीयो" आणि "मस्तीज ४" सारख्या चित्रपटांमध्ये देखील दिसली आहे. २०२३ मध्ये तिने जेरार्ड बटलरसोबत "कंदहार" या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले.
