TRENDING:

Weather Alert : मराठवाड्यात वारं फिरलं, तापमानात मोठी घट, 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Last Updated:
मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह आठ जिल्ह्यांचा पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/5
मराठवाड्यात वारं फिरलं, तापमानात मोठी घट, 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट
राज्यातील विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रसह मराठवाड्यात गारठा वाढला आहे. गेल्या आठवडाभरामध्ये थंडीचे प्रमाण कमी झाले होते. आता मात्र वातावरणात बदल जाणवत असून तापमानात घट होवून थंडीचा कडाका वाढला आहे. आज 1 डिसेंबर रोजी मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह आठ जिल्ह्यांचा पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी या 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे येथे शीतलहरींचा आणि थंडीच्या लाटेचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे. सोमवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 29.2 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10.2 अंश सेल्सिअस नोंदवले जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच आकाश निरभ्र राहील. तसेच जालना जिल्ह्यात दिवसभर अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच कमाल तापमानात दोन अंशाची घट होऊ शकते. याबरोबरच परभणीमध्ये गारठा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
advertisement
3/5
बीड जिल्ह्यात अंशतः ढगाळ. वातावरण राहून तापमानात घट होऊ शकते परिणामी थंडीमध्ये वाढ होईल. त्यामुळे कमाल तापमान 27.0 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15.0 अंश सेल्सिअस इतके राहील. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेला थंडी वाढण्याची दाट शक्यता आहे. तसेच हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांत सामान्यतः आकाश निरभ्र असणार आहे. याबरोबरच गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
advertisement
4/5
लातूर जिल्ह्यात तापमानात घट होऊन थंडी वाढणार आहे. तसेच येथे वातावरण कोरडे असणार आहे. त्यामुळे रविवारी लातूरमध्ये दिवसा तापमान अंदाजे 28.0 अंश, तर रात्री 15.0 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यात तापमानात घट होण्याची शक्यता आहे असून आकाश निरभ्र राहणार आहे. व थंडीचा कडाका आता मात्र वाढणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
advertisement
5/5
मराठवाड्यात गेल्या आठवड्यामध्ये थंडीचे प्रमाण कमी झाले होते, आता मात्र वातावरणात सातत्याने महत्त्वाचे बदल होत असल्याने आज 1 डिसेंबर रोजी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी 3 जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन विभागाने केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Alert : मराठवाड्यात वारं फिरलं, तापमानात मोठी घट, 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल