Weather Alert : महाराष्ट्रात आता येणार उष्णतेची लाट, सगळ्यात जास्त तापणार हा जिल्हा, हवामान विभागाचा इशारा
- Published by:Mohan Najan
Last Updated:
3 मार्च धुलिवंदनच्या रोजी उष्ण आणि कोरडे हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे. राज्यात कमाल तापमानात 3 ते 4 अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील काही दिवसांत तापमान आणखी वाढेल. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी.
advertisement
1/7

महाराष्ट्रात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. 3 मार्च धुलिवंदनच्या रोजी उष्ण आणि कोरडे हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे. राज्यात कमाल तापमानात 3 ते 4 अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील काही दिवसांत तापमान आणखी वाढेल. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी.
advertisement
2/7
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये दमट आणि उष्ण हवामान राहील. मुंबईत कमाल 29-32 अंश सेल्सिअस, किमान 24-26 अंश राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आर्द्रता जास्त असल्याने उकाडा तीव्र जाणवेल.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये कोरडे आणि उष्ण हवामान राहील. पुण्यात कमाल 31-34 अंश, किमान 16-19 अंश राहील.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबारमध्ये तापमान वाढ होईल. नाशिकमध्ये दिवसा 34-35 अंश, रात्री 18-21 अंश तापमान राहील.
advertisement
5/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, धाराशिवमध्ये उष्ण आणि कोरडे हवामान राहील. कमाल 33-36 अंशांपर्यंत, किमान 19-22 अंश राहील.
advertisement
6/7
विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणामध्ये सर्वाधिक उष्णता जाणवेल. कमाल 34-37 अंश, किमान 20-23 अंश राहील.
advertisement
7/7
एकंदरीत, महाराष्ट्रात तापमानात हळूहळू वाढ होत आहे. पुढील काही दिवसांत तापमानात मोठी वाढ होणार असल्याने नागरिकांना काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रात आता येणार उष्णतेची लाट, सगळ्यात जास्त तापणार हा जिल्हा, हवामान विभागाचा इशारा