TRENDING:

APMC Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आल्याचे दर तेजीत, डाळिंब आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? Video

Last Updated:

राज्यातील मार्केटमध्ये होळीच्या दिवशी वेगवेगळ्या कृषी मालाची मोठ्या प्रमाणात अवाक झाली. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये आले, द्राक्ष आणि डाळिंबाची आवक आणि भाव पाहुयात. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली: राज्यातील मार्केटमध्ये होळीच्या दिवशी वेगवेगळ्या कृषी मालाची मोठ्या प्रमाणात अवाक झाली. सोमवार, दिनांक 2 मार्च रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये आले, द्राक्ष आणि डाळिंबाची आवक आणि भाव पाहुयात. 
advertisement

आल्याच्या दरात सुधारणा

राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 1319 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये सर्वाधिक 839 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 3500 ते 5500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक भाव मिळाला. तसेच अमरावती मार्केटमध्ये आवक झालेल्या 68 क्विंटल आल्यास 5750 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

Success Story : नुकसानच होतं आलं शेवटी केला नवा प्रयोग, शेतकऱ्याचं नशीब पालटलं, यंदा 22 लाखांची कमाई

advertisement

द्राक्षाची आवक 

राज्याच्या मार्केटमध्ये आज 228 क्विंटल द्राक्षाची आवक राहिली. यापैकी सोलापूर बाजारात आवक झालेल्या 1250 बाॅक्स द्राक्षास 80 ते 360 रुपये प्रतिबाॅक्स प्रमाणे सर्वात कमी बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 17 क्विंटल द्राक्षास प्रतीनुसार 10000 ते 15000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

डाळिंब दराची लाली वाढली  

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आल्याचे दर तेजीत, डाळिंबला काय मिळाला भाव?
सर्व पहा

आज राज्याच्या मार्केटमध्ये 601 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी मुंबई बाजारात 340 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 10000 ते 16000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 41 क्विंटल डाळिंबास 12500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.

मराठी बातम्या/कृषी/
APMC Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आल्याचे दर तेजीत, डाळिंब आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल