TRENDING:

Sanju Samson : बंगला नव्हे हा तर महाल... 6 कोटींच्या आलिशान घरात राहतो संजू, Photo पाहून अवाक व्हाल!

Last Updated:
संजू सॅमसनच्या ऐतिहासिक खेळीमुळे टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. संजूच्या या कामगिरीनंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसंच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही चाहते इंटरनेटवर माहिती घेत आहेत.
advertisement
1/7
बंगला नव्हे हा तर महाल... 6 कोटींच्या आलिशान घरात राहतो संजू, Photo
संजू सॅमसन हा त्याची पत्नी चारुलतासह आलिशान घरात राहतो. केरळच्या तिरुअनंतपुरममध्ये संजूचं घर आहे, या घराची किंमत अंदाजे 6 कोटी रुपये आहे. संजूचं घर आधुनिक सुविधा आणि पारंपारिक भारतीय कला यांचं मिश्रण आहे.
advertisement
2/7
संजूच्या घराची बाहेरची बाजू पारंपारिक पद्धतीची आहे. प्रवेशद्वारावर मोठ्या लाकडी चौकटीचे काचेचे दरवाजे आणि खिडक्या आहेत. व्हरांड्याचा मजला पांढऱ्या संगमरवरी रंगाचा आहे, तर अंगण सुंदर फुलांच्या रांगोळी आणि पारंपारिक पितळी दिव्यांनी सजवलेले आहे, जे केरळच्या समृद्ध संस्कृतीचे प्रतिबिंब आहे.
advertisement
3/7
संजू सॅमसनच्या घरातील सोफा तपकिरी आणि क्रीम कलरचा आहे. तर पडदेही क्रीम कलरचे आहेत. लिव्हिंग रूमच्या एका कोपऱ्यात एक मोठा लाकडी शेल्फ आहे, ज्यात संजूच्या ट्रॉफी आणि पुरस्कार आहेत. संजूच्या घरातल्या एका कोपऱ्यात काळ्या शेल्फमध्ये लहान मूर्ती आहे, त्याच्यावर गोलाकार मंडला फ्रेम ठेवली आहे. तसंच एका कोपऱ्यात ड्रीम कॅचरही आहे.
advertisement
4/7
संजू सॅमसनच्या घरातील जिना पारंपारिक शैलीचे उत्तम उदाहरण आहे. जिना पूर्णपणे पॉलिश केलेल्या गडद लाकडापासून बनवलेला आहे, ज्यामुळे घराला एक जुना आणि शाही लूक मिळतो. पायऱ्यांच्या बाजूने कोरलेले लाकडी खांब आणि हँडरेल्स सौंदर्यात भर घालतात.
advertisement
5/7
संजू सॅमसनच्या घरातील बाल्कनीला सुरक्षिततेसाठी, स्टील रेलिंगमध्ये जाळी बसवली आहे आणि त्यावर सुंदर वेली लावण्यात आल्या आहेत. तर जमिनीवर कृत्रिम हिरवे गवत लावण्यात आलं आहे.
advertisement
6/7
संजूच्या घराच्या एका भागात चमकदार लाल भिंत आहे, या भिंतीजवळ असंख्य भांडी ठेवलेली आहेत. तसंच आराम करण्यासाठी लाकडी रेलिंगही आहे. संजूच्या घरातील फोटोग्राफीसाठी असलेलं हे ठिकाण वाटतं.
advertisement
7/7
फोटो सौजन्य : संजू सॅमसन इन्स्टाग्राम अकाऊंट
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Sanju Samson : बंगला नव्हे हा तर महाल... 6 कोटींच्या आलिशान घरात राहतो संजू, Photo पाहून अवाक व्हाल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल