TRENDING:

Tata Sierra, Thar आता विसरा, येतेय स्वस्तात दणकट गरिबांची डिफेंडर, किंमतही कमी, महाराष्ट्र कनेक्शन समोर

Last Updated:
विशेष म्हणजे, या JSW Motors Jetour T2 चं उत्पादन हे महाराष्ट्रात होणार आहे. चिनी कंपनीसोबत भागिदारी असली तरी छत्रपती संभाजीनगरमधील बिडकीन इथल्या प्लांटमध्ये असेंबल करणार आहे.
advertisement
1/12
Tata Sierra, Thar आता विसरा, येतेय स्वस्तात दणकट गरिबांची डिफेंडर, किंमतही कमी
भारतात सध्या कारच्या किंमती कमी झाल्यामुळे SUV घेणे आता शक्य झालं आहे. त्यामुळे टाटा मोटर्स, महिंद्रा मोटर्स आणि हुंदईने स्वस्तात मस्त अशा SUV गाड्यांचा पर्याय दिलाा आहे. आता SUV सेगमेंटमध्ये एक धाकड एसयूव्ही येणार आहे. ही एसयूव्ही डिफेंडरची कॉपी आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. मजबूत, दणकट आणि महिंद्राच्या Thar ला थेट भिडणारी अशी   JSW Motors ची Jetour T2 SUV लाँच होण्याच्या तयारीत आहे. या Jetour T2 चे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 
advertisement
2/12
 JSW Motors ही धाकड एसयूव्ही भारतात लवकरच घेऊन येत आहे.  JSW Motors ने याआधी MG मोटर्ससोबत भागिदारी करून कार लाँच केली. आता JSW Motors  Chery Automobile या  एका चिनी ऑटोमोबाईल कंपनीसोबत भागिदारी करून ही  Jetour T2 SUV भारतात आणणार आहे.
advertisement
3/12
विशेष म्हणजे, या कारचं उत्पादन हे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे. ही  JSW Motors Jetour T2 ही दिवाळी पर्यंत लाँच होण्याची शक्यता आहे. 
advertisement
4/12
JSW Motors ने Dealer Partner Recruitment अंतर्गत आपल्या अपकमिंग Plug-in Hybrid SUV चा एक Teaser सुद्धा प्रसिद्ध केला आहे. अलीकडेच या JSW Motors Jetour T2 चे खडकाळ रस्ते, भिंती फोडणे असे स्टंट केलेले व्हिडीओ व्हायरल झाले आहे. 
advertisement
5/12
JSW Motors Jetour T2 ची एक दमदार अशी डिफेंडरसारखी दिसणारी एसयूव्ही आहे.  JSW Motors Jetour T2  SUV ची सरळ आणि बॉक्सी डिझाईन आहे, व्हर्टिकल टेल लॅम्प आणि Piano-Black Elements दिले आहे.  JSW Motors Jetour T2 मध्ये व्हर्टिकल डोअर हँडल्स, उंच बंपर आणि टेलगेटवर स्क्वेअर बॉक्स सारखे एलिमेंट दिले आहे.
advertisement
6/12
JSW Motors Jetour T2 SUV च्या पुढच्या भागामध्ये LED लाईट स्ट्रिप्स दिले आहे, जे हेडलाईट्सचं काम कऱणार आहे,तसंच, बंपरमध्ये पिक्सेल डिझाइनचे LED Fog Lamps दिले आहे, ज्यामुळे गाडीला दमदार असा लूक येतो. JSW Motors Jetour T2 मध्ये एक सरळ बोनट आणि व्हील आर्चसह बाहेर आलेलं बंपर आहेत.
advertisement
7/12
Jetour T2 च्या इंटिरिअरमध्ये Robust Steering Wheel, 15.6 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 10.25 इंचाची डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले दिला आहे.  ही एक ५-सीटर एसयूव्ही असणार आहे. JSW Motors Jetour T2 मध्ये पॅनोरामिक सनरूफ, वायरलेस चार्जर, Sony चे १२ स्पीकर ऑडिओ सिस्टम, पॉवर आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सारखे प्रिमियम फिचर्स दिले जाणार आहे.
advertisement
8/12
JSW Motors Jetour T2 ही दणकट आणि दमदार अशी एसयूव्ही असणार आहे, आतापर्यंत या कारचे टिझर पाहिले तर भारतीय रस्त्यांसाठी सगळ्या टेस्ट घेण्यात आल्या आहे. JSW Motors Jetour T2 मध्ये  360-degree Camera, Level 2 ADAS, हिल स्टार्ट आणि हिल डिसेंट असिस्टन्स  सारखे फिचर्स असणार आहे.
advertisement
9/12
आंतरराष्ट्रीय बाजारात  JSW Motors Jetour T2 ही प्लग-इन हायब्रीड (PHEV) आणि ऑल-इलेक्ट्रिक अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.  पण, भारतात फक्त  हायब्रीड मॉडेल लाँच होण्याची शक्यता आहे.
advertisement
10/12
यामध्ये JSW Motors Jetour T2 च्या PHEV व्हेरिएंटमध्ये 154 HP पॉवर देणारे १.५-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन आणि २६.७ kWh ची बॅटरी असणार आहे. ही कार केवळ इलेक्ट्रिक मोडवर 139 किमी रेंज देईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे. 
advertisement
11/12
भारतात लाँच झाल्यानंतर JSW Motors च्या  Jetour T2 ची थेट स्पर्धा ही टाटा सियारा, क्रेटा, Mahindra XUV 7XO, Thar,  सारख्या लोकप्रिया गाड्यांशी असणार आहे. /SW Jetour T2 ची किंमत कंपनीने जाहीर केली नाही, पण १५ लाखांपासून या एसयूव्ही किंमत असणार असा अंदाज आहे.
advertisement
12/12
विशेष म्हणजे, या JSW Motors Jetour T2 चं उत्पादन हे महाराष्ट्रात होणार आहे. चिनी कंपनीसोबत भागिदारी असली तरी छत्रपती संभाजीनगरमधील बिडकीन इथल्या प्लांटमध्ये असेंबल करणार आहे. हा एक ग्रीनफिल्ड प्रोजेक्ट आहे. त्यामुळे या प्लांटला आधीपासून तयार केलं आहे. ६३० एकरमध्ये हा प्लांट असणार आहे. जवळपास या प्लांटमधून वर्षााला ५ लाख वाहनांची निर्मिती केली जाणार अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.  
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Tata Sierra, Thar आता विसरा, येतेय स्वस्तात दणकट गरिबांची डिफेंडर, किंमतही कमी, महाराष्ट्र कनेक्शन समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल