कुठल्याही कामांसाठी, एखादी गोष्ट सोपी करण्यासाठी AI युक्ती देत असतं. ऑफिसचं काम असो किंवा वजन कमी करण्यासाठी AIचा वापर होतोय.
एआय टूल्स वजन कमी करण्याची प्रक्रिया खूप सोपी करतात. वजन कमी करण्यासाठी AI लगेच आहारात बदल सुचवतं. यामुळे तुमच्या कॅलरीज मोजणं शक्य होतं. तसंच AI तुम्हाला व्यायामाची आठवण करून देतं. हे फायदे असले तरी AI वापरण्याचे काही तोटे असू शकतात.
advertisement
Muscle soreness : व्यायामानंतर स्नायू का दुखतात ? जाणून घ्या कारणं आणि उपचार
AI वापरण्याचे काही तोटे
एआय खूप हुशार असलं तरी ते डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञ नाही. म्हणून, वजन कमी करण्यासाठी डॉक्टरऐवजी एआयवर अवलंबून राहणं धोकादायक ठरू शकतं.
प्रत्येक व्यक्तीचं चयापचय, अनुवंशशास्त्र आणि वैद्यकीय इतिहास वेगवेगळा असतो. एआय बहुतेकदा उपलब्ध डेटावर आधारित एखादा सामायिक सल्ला देतं. AI ला तुमच्या शरीराच्या सूक्ष्म गरजा समजत नाही ज्या आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांना समजू शकतात.
वैद्यकीय परिस्थितींकडे दुर्लक्ष - थायरॉईड, पीसीओडी, मधुमेह किंवा इतर कोणताही आजार असेल तर एआय डाएट प्लॅन फॉलो करणं धोकादायक ठरू शकतं. अयोग्य डाएटमुळे पौष्टिक कमतरता किंवा हार्मोनल असंतुलन होऊ शकतं.
Health Tips : पायांवरची लक्षणं देतात धोक्याची चाहूल, सावध व्हा, वेळेवर उपचार करा
क्रॅश डाएट आणि मानसिक ताण - वजन लवकर कमी करण्यासाठी एआय खूप कमी कॅलरीज असलेले आहार सुचवू शकतं. यामुळे शारीरिक कमकुवतपणा तर जाणवतोच पण सतत कॅलरीज ट्रॅक करणं आणि मशीनच्या सूचनांचं पालन केल्यानं खाण्याचे विकार किंवा मानसिक ताण देखील येऊ शकतो.
डेटाबद्दल प्रश्न: एआय ऑनलाइन उपलब्ध असलेल्या डेटावर आधारित माहिती देतं. वजन कमी करण्याबाबत ऑनलाइन बरीच चुकीची माहिती देखील उपलब्ध आहे. म्हणून, एआयनं दिलेला सल्ला नेहमीच अचूक नसतो हे लक्षात ठेवा. काही टिप्सचा उपयोग करणं आणि पूर्णपणे त्यावर विसंबून राहणं यात मोठा फरक आहे.
