TRENDING:

Health Tips : लठ्ठपणाची समस्या जाणवतेय? भूकेवर नाही नियंत्रण, डॉक्टरांनी सांगितल्या सोप्या टिप्स

Last Updated:
अनेक जणांना वेगवेगळ्या त्रासांना सामोरे जावे लागते. त्यामुळे लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातात.
advertisement
1/7
लठ्ठपणाची समस्या जाणवतेय? भूकेवर नाही नियंत्रण, डॉक्टरांनी सांगितल्या टिप्स
लठ्ठपणाची समस्या अनेकांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे अनेक जणांना वेगवेगळ्या त्रासांना सामोरे जावे लागते. त्यामुळे लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातात.
advertisement
2/7
परंतु भुकेवर नियंत्रण मिळवता न आल्यामुळे ते वजन कमी करण्याचे प्रयत्न सोडून देतात. मात्र तुमचं वजन तुम्ही कसं नियंत्रित करू शकता? याबद्दलचं आहार सल्लागार डॉक्टर अमृता कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे.
advertisement
3/7
लठ्ठपणाच्या समस्येमुळे आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. अनेकांना वजन तर कमी करायचे असते. मात्र त्यांच्या भुकेवर नियंत्रण राहत नाही. यासाठी ज्यांचं वजन वाढलेलं आहे अशा व्यक्तींनी खाद्यपदार्थांचं दोन गटात वर्गीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे, असं डॉक्टर अमृता कुलकर्णी सांगतात.
advertisement
4/7
यामध्ये तुम्ही लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेले खाद्यपदार्थ आणि हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेले खाद्यपदार्थ असं वर्गीकरण करू शकता. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे ज्या खाद्यपदार्थांचे सेवन केल्यानंतर त्यातील शर्करा रक्त शर्करेत लवकर विरघळण्यासाठी लागणारा कालावधी होय.
advertisement
5/7
जे खाद्यपदार्थ लवकर रक्तात रक्त शर्करा रिलीज करते त्यांना हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेले खाद्यपदार्थ असं म्हटलं जातं. ज्या खाद्यपदार्थांचा रक्त शर्करा रक्तात रिलीज करण्याचा वेग कमी आहे त्यांना लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेले खाद्यपदार्थ असे म्हटले जाते.
advertisement
6/7
त्यामुळे तुम्ही लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये डाळी, पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य इत्यादींचा समावेश आहारात करू शकता. तर हाय इंडेक्स असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये साखर, भात, आंबा, टरबूज यासारख्या पदार्थांचा समावेश होतो. लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये डाळी, पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य इत्यादींचा समावेश होतो. तर हाय इंडेक्स असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये साखर, भात, आंबा, टरबूज यासारख्या पदार्थांचा समावेश होतो.
advertisement
7/7
डॉक्टर अमृता कुलकर्णी सांगतात की, वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी भूक लागल्यास लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेले खाद्यपदार्थ सेवन करावेत. ज्यामुळे त्यांची भूक नियंत्रणात राहील आणि वजन देखील वाढणार नाही. अशा पद्धतीने नागरिक भूक नियंत्रणात न ठेवताही आपले वजन नियंत्रणात ठेवू शकतात, असं आहार सल्लागार डॉक्टर अमृता कुलकर्णी यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : लठ्ठपणाची समस्या जाणवतेय? भूकेवर नाही नियंत्रण, डॉक्टरांनी सांगितल्या सोप्या टिप्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल