'प्रत्येक खेळाडूने 50-50 लाख रुपये द्या...', वर्ल्ड कपमधून बाहेर पडताच पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची कामगिरी खराब झाली, सुपर-8 मध्येच पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आलं, त्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप आला आहे.
advertisement
1/7

पाकिस्तानने ग्रुप स्टेजमधले त्यांचे 4 पैकी 3 सामने रडतखडत जिंकले तर भारताविरुद्ध त्यांना पुन्हा एकदा पराभव पत्करावा लागला, यानंतर सुपर-8 मध्येही पाकिस्तानची कामगिरी खराब झाली.
advertisement
2/7
न्यूझीलंडविरुद्धचा त्यांचा सामना पावसामुळे रद्द झाला आणि इंग्लंडविरुद्ध त्यांना पराभवाचा धक्का बसला, यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्यांना शेवटच्या बॉलवर विजय मिळाला, त्यामुळे सेमी फायनलआधीच पाकिस्तानची टीम बाहेर झाली.
advertisement
3/7
वर्ल्ड कपमधल्या खराब कामगिरीनंतर आता पाकिस्तानी खेळाडूंवर बोर्डाकडून कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रत्येक खेळाडूला 50-50 लाख रुपयांचा दंड आकारला आहे. एखाद्या क्रिकेट बोर्डाने खेळाडूंकडून पैसे घेण्याची ही पहिलीच वेळ असू शकते.
advertisement
4/7
ग्रुप स्टेजमध्ये भारताविरुद्ध पराभव झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खूप लाड झाले, आता कामगिरीवर पैसे दिले जातील, असं बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी खेळाडूंना सांगितल्याचं वृत्त आहे.
advertisement
5/7
पाकिस्तानी चाहत्यांप्रमाणेच बोर्डही खेळाडूंच्या कामगिरीवर नाराज आहे. चांगलं खेळल्यावर बक्षीस मिळत असेल तर खराब कामगिरीनंतर दंड देण्याची तयारी ठेवा, असा फतवा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने काढला आहे. भारताविरुद्धच्या पराभवानंतर खेळाडूंना लगचेच याची माहिती देण्यात आले.
advertisement
6/7
पीसीबी त्यांच्या ए ग्रेडच्या खेळाडूंना 45 लाख रुपये महिना, आणि आयसीसी महसुलातून 27 लाख रुपये, बी ग्रेडच्या खेळाडूंना 30 लाख आणि आयसीसी महसुलातून 15 लाख रुपये, सी ग्रेडच्या खेळाडूंना 10 लाख आणि आयसीसी महसुलातून 10 लाख, डी ग्रेडमधील खेळाडूंना 7 लाख आणि आयसीसी महसुलातून 5.7 लाख रुपये मिळतात.
advertisement
7/7
टी-20 वर्ल्ड कपमध्ये साहिबजादा फरहान 383 रनसह पाकिस्तानचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. सॅम अयुब, सलमान आघा, बाबर आझम आणि उस्मान खान यांना 100 रनही करता आल्या नाहीत. 10 विकेट घेणाऱ्या उस्मान तारिकशिवाय पाकिस्तानचे इतर बॉलरही अपयशी ठरले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
'प्रत्येक खेळाडूने 50-50 लाख रुपये द्या...', वर्ल्ड कपमधून बाहेर पडताच पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप!