'आपण 8 वर्षांपूर्वी जोडलेले नातं...' आई कुठे काय करते फेम अभिनेत्रीला वाढदिवशी खास व्यक्तीनं दिल्या शुभेच्छा
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
'आई कुठे काय करते' या मालिकेत अनघा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे. तिची ही भूमिका घराघरात लोकप्रिय झाली. ही अभिनेत्री आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. तिला आजच्या दिवशी चाहते भरभरून शुभेच्छा देत आहेत. पण तिला एका खास व्यक्तीने दिलेल्या शुभेच्छा चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
advertisement
1/8

'आई कुठे काय करते' या मालिकेत अनघा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे. तिची ही भूमिका घराघरात लोकप्रिय झाली.
advertisement
2/8
ही अभिनेत्री आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. अश्विनीला आजच्या स्पेशल दिवशी तिच्या आयुष्याच्या जोडीदाराने शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. नक्की कोण आहे अश्विनीचा जोडीदार जाणून घ्या.
advertisement
3/8
अश्विनी निलेश जगदाळे या तरुणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघेही अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो शेअर करतात. अश्विनीने देखील त्याच्यासोबतचा एक रोमँटिक व्हिडिओ शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती.
advertisement
4/8
आज अश्विनीच्या वाढदिवशी निलेश जगदाळेने देखील तिच्यासाठी पोस्ट शेअर केली आहे. त्याने दोघांचा एक रोमँटिक व्हिडिओ शेअर करत एक छान कॅप्शन लिहिलं आहे.
advertisement
5/8
अश्विनीसाठी निलेशने लिहिलंय की, 'या आपल्या 8 वर्षांच्या प्रवासात खुप चढ-ऊतार, सुख-दुखः पाहीले, खुप लोकांचा सहवास लाभला, काहींनी जोडून ठेवले तर काहींनी तोडले पण त्यातूनही कायम राहिले ते आपण 8 वर्षांपूर्वी जोडलेले नातं. आईने सागितल्याप्रमाणे माणूस नेहमी मोठा असायला हवा व ते कायम जपायला हवे. नानांना दिलेल्या शब्दांपासून कधी मागे हटणार नाही, कायम सोबत आहे'
advertisement
6/8
त्याने पुढे म्हटलं आहे की, 'वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा बछडी, खुप मोठी हो. तिला बोलायला आवडते आणि मला ऐकायला' अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहे. त्याच्या या पोस्टवर अश्विनीने 'लव्ह यु बाबा' अशी कमेंट केली आहे.
advertisement
7/8
दरम्यान निलेशबाबत सांगायचे झाल्यास त्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवरील बायोनुसार, फार्मफ्रेश ऑरगॅनिक फ्रेश या संस्थेचा संस्थापक आहे. शिवाय त्याने अश्विनीसोबत फ्लाइंग एंजल या ब्युटी, कॉस्मेटिक आणि पर्सनल केअर ब्रँडचीही सुरुवात केली आहे.
advertisement
8/8
अश्विनी आणि निलेश 'रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान'मध्ये कार्यकर्ते म्हणूनही काम पाहतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'आपण 8 वर्षांपूर्वी जोडलेले नातं...' आई कुठे काय करते फेम अभिनेत्रीला वाढदिवशी खास व्यक्तीनं दिल्या शुभेच्छा