IPL 2026 : पहिल्या दोन्ही मॅच हरल्या... तरी 14 कोटींचा खेळाडू बाहेर, CSK ने निवडली शॉकिंग प्लेइंग इलेव्हन!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 मध्ये आरसीबीचा सामना सीएसकेविरुद्ध होत आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये ही हायव्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे.
advertisement
1/9

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात सीएसकेची कामगिरी निराशाजनक झाली आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नईने 2 पैकी दोन्ही सामने गमावले आहेत. पॉईंट्स टेबलमध्येही चेन्नई शेवटच्या म्हणजेच दहाव्या क्रमांकावर आहे.
advertisement
2/9
दुसरीकडे गतविजेत्या आरसीबीने या मोसमात आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला आहे, ज्यात त्यांना विजय मिळाला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये आरसीबी चौथ्या क्रमांकावर आहे. या सामन्यात विजय मिळवून आरसीबीला पहिल्या क्रमांकावर जायची संधी आहे.
advertisement
3/9
आयपीएलच्या इतिहासात आरसीबी आणि सीएसके यांच्यात झालेल्या सामन्यांमध्ये सीएसकेचा पगडा भारी आहे. सीएसकेने 21 सामन्यांमध्ये तर आरसीबीने 13 सामन्यांमध्ये विजय मिळवला. तर चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आरसीबीने 6 आणि सीएसकेने 5 सामने जिंकले आहेत.
advertisement
4/9
आरसीबी आणि सीएसके यांच्यातला सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होत आहे. या स्टेडियमची खेळपट्टी बॅटिंगसाठी अनुकूल आहे, त्यामुळे 200 पेक्षा जास्त रन अगदी सहज होतात आणि हे आव्हान पारही तितक्याच सहज पारही केलं जातं.
advertisement
5/9
या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. या मैदानात बऱ्याच रन होतात, खेळपट्टीही चांगली दिसत आहे, त्यामुळे आम्ही त्यांना कमी स्कोअरवर रोखण्याचा प्रयत्न करू. एमएस धोनी हळू हळू बरा होत आहे, असं ऋतुराज टॉसनंतर म्हणाला आहे. सीएसकेने त्यांच्या टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही.
advertisement
6/9
टॉस जिंकून आम्हीही बॉलिंग घेतली असती, पण खेळपट्टी चांगली आहे, त्यामुळे पहिले बॅटिंग करायला मजा येईल. पहिल्या सामन्यात आम्ही उत्कृष्ट खेळलो, हीच कामगिरी पुन्हा करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असं आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार म्हणाला आहे. आरसीबीनेही त्यांच्या टीममध्ये बदल केलेला नाही.
advertisement
7/9
सीएसकेने लिलावामध्ये कार्तिक शर्माला 14.20 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं, पण आरसीबीविरुद्धच्या सामन्यात कार्तिक शर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आलेली नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
advertisement
8/9
आरसीबीची प्लेइंग इलेव्हन : फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, अभिनंदन सिंग, जेकब डफी
advertisement
9/9
सीएसकेची प्लेइंग इलेव्हन : संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड, आयुष म्हात्रे, सरफराज खान, शिवम दुबे, प्रशांत वीर, जेमी ओव्हरटन, नूर अहमद, अंशूल कंबोज, मॅट हेन्री, खलील अहमद
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : पहिल्या दोन्ही मॅच हरल्या... तरी 14 कोटींचा खेळाडू बाहेर, CSK ने निवडली शॉकिंग प्लेइंग इलेव्हन!