Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा वारं फिरलं, जोरदार पाऊस कोसळणार, हवामान खात्याकडून अलर्ट
- Published by:Mohan Najan
- local18
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
काही भागांमध्ये वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
1/7

5 एप्रिल रोजी राज्यातील हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता असून, हवामान विभागाकडून राज्यातील 7 जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर काही भागांमध्ये वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विभागानुसार जाणून घेऊयात हवामानाचा अंदाज.
advertisement
2/7
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पालघरमध्ये उष्ण आणि दमट हवामान कायम राहील. मुंबईत कमाल 30-34 अंश सेल्सियस तर किमान 24-27 अंश राहील. आर्द्रता जास्त असल्याने उकाडा तीव्र जाणवेल.
advertisement
3/7
मराठवाड्यात नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि पावसाच्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जालना, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये अधिकृत अलर्ट नसला तरी काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उभ्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी.
advertisement
4/7
विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेषतः वीज कोसळण्याच्या घटनांचा धोका लक्षात घेता, उघड्यावर राहणे टाळावे आणि सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, काही भागांत वातावरण ढगाळ राहून वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तापमानात किंचित घट होण्याचा अंदाज असून, उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळू शकतो.
advertisement
6/7
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्येही अधिकृत अलर्ट नाही. तरीही, वातावरणात बदल होऊन काही ठिकाणी वाऱ्याचा वेग वाढण्याची आणि पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
advertisement
7/7
एकूणच राज्यभरात हवामान अस्थिर राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी अचानक पावसामुळे जनजीवनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा वारं फिरलं, जोरदार पाऊस कोसळणार, हवामान खात्याकडून अलर्ट