Fitness Mantra :60 व्या वर्षीही एकदम फिट आहेत 'हे' कलाकार; तरूणांनाही लाजवेल असा फिटनेस
- Published by:Tushar Shete
Last Updated:
अनेक युवा कलाकारांना फिटनेसची आवड आहेत. मात्र बॉलिवूडमध्ये असेही काही कलाकार आहे जे साठीच्या जवळ पोहोचले असले तरीही त्यांनी आपला फिटनेस जपलाय. अक्षय कुमार, सलमान खान, शाहरूख खान, आमिर खान ही काही महत्वाची नावं
advertisement
1/7

अक्षय कुमार (57), सलमान (58) यांना सीनियर सिटीझन क्लबमध्ये पोहोचण्यासाठी अद्याप काही वर्षे आहेत. मात्र दोघेही अद्यापही त्याच ताकदीने ॲक्शन सीन देतात.
advertisement
2/7
आमिर खान (59) , शाहरूख (59) यांनीही आपला फिटनेस चांगलाच जपलाय. गेल्या काही वर्षात आमिर खानने ॲक्शन सिनेमा केला नसला तरीही, शाहरूख खानने मात्र गेल्या वर्षी जवान, पठाण सारख्या ॲक्शन सिनेमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय.
advertisement
3/7
अनिल कपूर (67) आणि अनुपम खेर (69) यांनी वयाच्या साठीनंतरही आपला फिटनेस चांगलाच जपलाय. फिटनेस सोबत अनिल कपूरने आपला चार्म आणि स्टारडमही शाबूत ठेवलंय. अनिल कपूर आणि अनुपम खेर हे बॉलिवूडमध्ये जुने मित्र आहेत. अनेक सुख-दु:खाच्या काळात दोघेही एकमेकांना साथ देतात.
advertisement
4/7
नुकतंच दोघांनी वर्कआऊट करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. यात दोघेही एकत्र वर्कआऊट करताना दिसत आहेत.
advertisement
5/7
अनुपम खेर यांच्यासोबत प्लॅक्स, वेटलिफ्टींग, सायकलींग करताचे फोटो अनिल कपूरने त्याच्या इन्स्टाग्राम हँडरवर शेअर केलेत.
advertisement
6/7
असं नाहीये की, हे दोघे नेहमी एकत्र व्यायाम करतात. दोघांच्याही घरी त्यांची स्वतंत्र जीम आहे, जिथे दोघे आपल्यावेळेनुसार वर्कआऊट करतात.
advertisement
7/7
अनिल कपूर कुठेही असला तरीही वर्कआऊट करायला विसरत नाही. शूटींगसाठी बाहेर असताना जर जीममध्ये जायला जमलं नाही तर तो सायकलींग करून किंवा टेनिस खेळून स्वत:ला फीट ठेवतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Fitness Mantra :60 व्या वर्षीही एकदम फिट आहेत 'हे' कलाकार; तरूणांनाही लाजवेल असा फिटनेस