IPL 2026 : 14 वर्षांचा वनवास संपला! घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सने डाग पुसला
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
कोलकत्ता नाईट राईडर्सने दिलेल्या 221 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनने चांगली सूरूवात केली होती.
advertisement
1/8

आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात मुंबईच्या वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्सने कोलकत्ता नाईट रायडर्सचा 6 विकेट राखून पराभव केला आहे.
advertisement
2/8
कोलकत्ताने प्रथम फलंदाजी करताना 221 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यामुळे मुंबई इंडियन्सने हे लक्ष्य गाठत हा सामना जिंकला आहे. विशेष म्हणजे मुंबईने हे रेकॉर्डब्रेक लक्ष्य चेस केलं आहे.
advertisement
3/8
कोलकत्ता नाईट राईडर्सने दिलेल्या 221 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनने चांगली सूरूवात केली होती.
advertisement
4/8
रोहित शर्माने सूरूवातीपासून आक्रामक खेळी करत 23 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं होते. त्याच्या पाठोपाठ रिकल्टने देखील 25 बॉलमध्ये अर्धशतकीय खेळी केली होती.
advertisement
5/8
यानंतरही दोघांनी आक्रामक खेळी सूरूच ठेवली होती.पण पुढे जाऊन रोहित शर्मा 38 बॉलमध्ये 78 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने 6 षटकार आणि 6 चौकार लगावले होते.
advertisement
6/8
रोहित बाद होताच सूर्या मैदानात आला पण तो 16 धावांवर बाद झाला होता.त्याच्यानंतर तिलक वर्मा मैदानात आला होता. या दरम्यान चांगला फॉर्मात असलेला रायन रिकल्टन 43 बॉलमध्ये 81 धावांची खेळी केली होती.
advertisement
7/8
त्यानंतर कॅप्टन हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा मैदानात होते.पण मुंबई विजयानजीक कर असताना तिलक वर्मा 20 धावांवर बाद झाला. तर हार्दिक पांड्याने शेवटी औपचारीक धावा पूर्ण करत मुंबईला हा सामना जिंकून दिला.
advertisement
8/8
आयपीएल मधला हा पहिलाच सामना जिंकून मुंबई इंडियन्सने 14 वर्षांच्या वनवास संपवला आहे. कारण मागच्या 14 वर्षात मुंबईला एकदाही आयपीएलचा पहिला सामना जिंकता आला नव्हता. पण मुंबईने हा सामना जिंकून आता वनवास संपवला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : 14 वर्षांचा वनवास संपला! घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सने डाग पुसला