IPL 2026 : मॅच जिंकली तरी चेहरा पडला... चॅम्पियन होण्यासाठी मुंबईला 5 चुका टाळाव्याच लागणार!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएलच्या आपल्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सने केकेआरला पराभवाचा धक्का दिला आहे. आयपीएलच्या इतिहासातला मुंबई इंडियन्सचा हा सगळ्यात मोठा विजय ठरला.
advertisement
1/8

केकेआरने दिलेलं 221 रनचं आव्हान मुंबईने 19.1 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून पार केलं. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबईने एवढ्या मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला.
advertisement
2/8
2012 नंतर मुंबई इंडियन्सने पहिल्यांदाच मोसमातला पहिला सामना जिंकला. मुंबईने या सामन्यात विजय मिळवला असला तरी त्यांनी काही चुका केल्या ज्या त्यांना पुढच्या सामन्यांमध्ये टाळाव्या लागणार आहेत.
advertisement
3/8
वानखेडेच्या खेळपट्टीवर मुंबई इंडियन्सने अल्लाह गझनफर आणि मयंक मार्कंडे या दोन स्पिनरना खेळवण्याचा निर्णय घेतला. वानखेडेचं मैदान हे छोटं आहे आणि या खेळपट्टीवर स्पिनरना मदत मिळत नाही, तरीही मुंबईने हा निर्णय घेतला.
advertisement
4/8
अल्लाह गझनफरने त्याच्या 4 ओव्हरमध्ये तब्बल 51 रन दिल्या तर मयंक मार्कंडेने फक्त 1 ओव्हर टाकून 16 रन दिले, त्यामुळे पुढच्या सामन्यात मुंबई गझनफरऐवजी कॉर्बिन बॉशला संधी द्यायचा विचार करू शकते.
advertisement
5/8
मुंबईने 221 रनचा यशस्वी पाठलाग केला असला तरी टीमने 220 रन दिले हेदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. मुंबईचा हुकमी एक्का असलेल्या जसप्रीत बुमराहला पॉवर प्लेमध्ये फक्त एकच ओव्हर देण्यात आली. सुरूवातीलाच बुमराहला बॉलिंग दिली असती तर रहाणे आणि ऍलन यांची विकेट घेण्याची संधी मुंबईला मिळाली असती.
advertisement
6/8
रोहित शर्माने या सामन्यात वादळी अर्धशतक केलं असलं तरी फिल्डिंगमध्ये त्याने अंगरीक्ष रघुवंशीचा कॅच सोडला. या जीवनदानाचा रघुवंशीने फायदा उचलला आणि अर्धशतकी खेळी केली.
advertisement
7/8
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला या सामन्यात बॉलिंगमध्ये संघर्ष करावा लागला. पांड्याच्या ओव्हरमध्ये केकेआरने तब्बल 26 रन काढल्या ज्यात 3 फोर आणि 2 सिक्स होत्या. पांड्याने 3 ओव्हरमध्ये 39 रन देऊन 1 विकेट घेतली.
advertisement
8/8
सूर्यकुमार यादव या सामन्यात पुन्हा एकदा अपयशी ठरला. टी-20 वर्ल्ड कपपासून सूर्याच्या बॅटमधून रन येत नाहीयेत. केकेआरविरुद्ध सूर्यकुमार यादवने 16 रनची खेळी केली. आयपीएलच्या पुढच्या सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवचं फॉर्ममध्ये येणं मुंबई इंडियन्ससाठी गरजेचं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : मॅच जिंकली तरी चेहरा पडला... चॅम्पियन होण्यासाठी मुंबईला 5 चुका टाळाव्याच लागणार!