आयपीएलच्या पहिल्या सामन्यात आरसीबीने हैदराबादविरुद्धची मॅच फक्त 16व्या ओव्हरमध्ये जिंकली. 201 धावांचे टार्गेट त्यांनी 15.4 ओव्हरमध्ये पार करत मोठा विजय साकारला. तर आज मुंबईने वानखेडे मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवला. केकेआरने विजयासाठी दिलेले 220 धावांचे लक्ष्य मुंबईने यशस्वीपणे पार केले. मुंबईने 2012 नंतर प्रथम सीझनच्या पहिल्या मॅचमध्ये विजय मिळवला आहे.
पहिल्या दोन्ही सामन्यात 200हून अधिक धावांचे टार्गेट पार केले. त्यामुळे गुणतक्त्यात कोण आघाडीवर असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पहिल्या दोन सामन्यांनंतर गुणतालिकेत RCB पहिल्या स्थानावर आहे. त्यांनी एक सामना खेळून एक विजय मिळवला असून त्यांच्याकडे 2 गुण आहेत. विशेष म्हणजे त्यांचा नेट रनरेट (NRR) +2.907 इतका प्रभावी आहे.
advertisement
दुसऱ्या स्थानावर मुंबई इंडियन्सची टीम आहे. मुंबईनेही एक सामना जिंकत 2 गुण मिळवले आहेत. मात्र त्यांचा नेट रनरेट +0.687 असल्यामुळे ते RCB पेक्षा मागे आहेत.
या दोन्ही संघांनी स्पर्धेच्या सुरुवातीलाच दमदार कामगिरी करत इतर संघांना इशारा दिला आहे. उर्वरित सर्व संघांनी अद्याप सामने खेळायचे असल्याने ते गुणतालिकेत खाली आहेत.
IPL 2026 च्या सुरुवातीलाच RCB आणि मुंबई इंडियन्स यांच्यात अव्वल स्थानासाठी चुरस दिसून येत आहे. पुढील सामन्यांमध्ये इतर संघ कशी कामगिरी करतात यावर गुणतालिकेचे चित्र आणखी स्पष्ट होणार आहे.
