IPL 2026 : तो सव्वा वर्षाचा होता तेव्हा रोहितने जिंकला होता वर्ल्डकप, आता हिटमॅनसोबत खेळतोय, कोण आहे मुंबईचा मिस्ट्री स्पिनर
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
या मॅचमध्ये मुंबई इडियन्सने एका मिस्ट्री स्पिनरला संधी दिली आहे. हा मिस्ट्री स्पिनर नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
1/11

आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यात मुंबईच्या वानखेडेच्या मैदानावर रोमांचक सामना सूरू आहे.
advertisement
2/11
या सामन्यात हार्दिक पांड्याने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.त्यामुळे कोलकत्ता नाईट रायडर्स प्रथम फलंदाजीला उतरली आहे आणि तिने पॉवरप्लेमध्ये 78 धावा केल्या आहेत.
advertisement
3/11
या मॅचमध्ये मुंबई इडियन्सने एका मिस्ट्री स्पिनरला संधी दिली आहे. हा मिस्ट्री स्पिनर नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
4/11
खरं तर रोहित शर्माने ज्यावेळेस भारतासाठी पहिला टी20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळेस हा खेळाडू फक्त सव्वा वर्षाचा होता.पण आता वेळ अशी आली आहे तो रोहित शर्मासोबत आयपीएलमध्ये खेळतो आहे. त्यामुळे हा खेळाडू कोण आहे? अशी चर्चा रंगली आहे.
advertisement
5/11
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी अफगाणिस्तानचा 20 वर्षीय स्पिनर गोलंदाज अल्लाह गझनफार आहे. गझनफारचा जन्म हा 20 मार्च 2006 रोजी झाला होता.त्याच्या जन्माच्या एक वर्षांने भारताने महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात पहिल्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला होता. या वर्ल्डकप विजयी टीमचा रोहित शर्मा देखील एक भाग होता.त्यामुळे रोहितने वर्ल्ड कप जिंकला तेव्हा तो सव्वा वर्षांचा होता.
advertisement
6/11
आयपीएल 2025 पूर्वी झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्सने गझनफरला 4.8 कोटी रुपयांना विकत घेतले. गझनफरची अलीकडील कामगिरी प्रभावी ठरली आहे. केकेआरलाही त्याला पुन्हा संघात घ्यायचे होते. पण अखेरीस मुंबई इंडियन्सने बाजी मारली आणि या प्रतिभावान फिरकीपटूला आपल्या संघात सामील करून घेतले. मात्र, दुखापतीमुळे तो संपूर्ण हंगामातून बाहेर पडला.
advertisement
7/11
आयपीएल 2024चे विजेतेपद पटकावणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचाही गझनफर एक भाग होता. मुजीब उर रहमानच्या जागी त्याला संघात स्थान देण्यात आले होते. मात्र, त्याला संपूर्ण हंगामात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
advertisement
8/11
अल्लाह गजनफर हा 2025 ला आशिया कपला देखील खेळला होता. विशेष म्हणजे त्याचं आंतरराष्ट्रीय सामन्यात डेब्यू झाला नसताना देखील त्याला आशिया कपच्या टीममध्ये घेतलं होतं.
advertisement
9/11
अल्लाह गझनफरने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात वेगवान गोलंदाज म्हणून केली. नंतर, अफगाणिस्तानचे माजी कर्णधार दौलत अहमदझाई यांनी त्याला 'मिस्ट्री स्पिनर' म्हटले.
advertisement
10/11
त्याने 2024 च्या 19वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत चार सामन्यांत आठ बळी घेत उत्कृष्ट कामगिरी केली. या कामगिरीमुळे त्याला वरिष्ठ संघात खेळण्याची संधी मिळाली.
advertisement
11/11
अल्लाह गझनफरने आतापर्यंत 14 वनडे सामन्यात 23, पाच टी20 मध्ये 2 तर एका टेस्ट सामन्यात त्याने 4 विकेट घेतल्या होत्या,अशी त्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्द आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : तो सव्वा वर्षाचा होता तेव्हा रोहितने जिंकला होता वर्ल्डकप, आता हिटमॅनसोबत खेळतोय, कोण आहे मुंबईचा मिस्ट्री स्पिनर