TRENDING:

Weather Alert: सावधान! महाराष्ट्रावर आता तिहेरी संकट, 72 तास धोक्याचे, 20 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात मार्चअखेर मोठे उलटफेर होत असून अवकाळी संकटाचा धोका वाढला आहे.
advertisement
1/7
Weather Alert: सावधान! महाराष्ट्रावर आता तिहेरी संकट, 72 तास धोक्याचे, 20 जिल्ह्यांना अलर्ट
महाराष्ट्रातील हवामानात मार्चअखेर मोठे उलटफेर जाणवत आहेत. अवकाळी संकटाचा धोका वाढला 30 मार्चसाठी हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्यातील 15 जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट तर 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील 72 तास धोक्याचे असणार आहेत. सविस्तर हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/7
राज्यातील नाशिक, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, बीड, लातूर, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, अकोला, अमरावती, गडचिरोली आणि नागपूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. अहिल्यानगर (अहमदनगर), सोलापूर, बीड, लातूर आणि धाराशिव परिसरात अवकाळी संकट अधिक तीव्र राहणार आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असेल. या भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
3/7
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अंशतः ढगाळ व दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडू शकतात. मात्र, उष्णता आणि आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवेल. 31 मार्चपासून दक्षिण कोकणात वादळी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
4/7
मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा भागात वादळी पावसाची शक्यता आहे. तर सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. संपूर्ण मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळू शकतात. काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.
advertisement
5/7
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरसह सर्वच जिल्ह्यांना अवकाळी तडाखा बसण्याची शक्यता आहे. बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना सोमवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदडेला यलो अलर्ट असेल. विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेती पिकांना धोका निर्माण होऊ शकतो.
advertisement
6/7
विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उष्णतेसोबत ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून विजांचा धोका अधिक राहणार आहे.दरम्यान, राज्यातील कमाल तापमान 34 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहील, तर किमान तापमान 20 ते 25 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
दरम्यान, मार्चअखेर अवकाळी संकटाचा धोका वाढला आहे. नागरिकांनी विजा आणि जोरदार वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. तसेच शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी सूचना हवामान विभागाने दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Weather Alert: सावधान! महाराष्ट्रावर आता तिहेरी संकट, 72 तास धोक्याचे, 20 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल