TRENDING:

परत म्हणू नका! सांगितलं नाही, घरमालक भाडेकरूंसाठी १ एप्रिलपासून 'हे' नवीन नियम लागू होणार

Last Updated:
New Rules : नवीन आयकर अधिनियम २०२५ अंतर्गत हे महत्त्वाचे बदल प्रस्तावित करण्यात आले असून, १ एप्रिल २०२६ पासून हे नियम लागू होणार आहेत.
advertisement
1/5
परत म्हणू नका! सांगितलं नाही,घरमालक भाडेकरूंसाठी १ एप्रिलपासून 'हे' नवीन नियम लागू होणार
मुंबई : घरभाडे भत्ता (HRA) क्लेम करणे आता पूर्वीसारखे सोपे राहणार नाही. नव्या आयकर नियमांनुसार, भाडे सवलत घेणाऱ्या करदात्यांना घरमालकाशी असलेले नाते स्पष्टपणे जाहीर करावे लागणार आहे. नवीन आयकर अधिनियम २०२५ अंतर्गत हे महत्त्वाचे बदल प्रस्तावित करण्यात आले असून, १ एप्रिल २०२६ पासून हे नियम लागू होणार आहेत.
advertisement
2/5
सरकारने यासाठी नवीन ड्राफ्ट नियम आणि फॉर्म जाहीर केले असून, अंतिम अधिसूचना लवकरच जारी होणार आहे. या बदलांमध्ये सर्वाधिक लक्षवेधी बदल म्हणजे नवीन फॉर्म १२४. या फॉर्मनुसार, HRA क्लेम करताना कर्मचाऱ्यांना ज्या घरमालकाला भाडे दिले जाते, त्याच्याशी आपले कौटुंबिक किंवा इतर कोणतेही नाते आहे का, हे स्पष्ट करणे बंधनकारक असेल. सध्याच्या व्यवस्थेत ही माहिती देणे आवश्यक नव्हते.
advertisement
3/5
खोट्या भाडेपावत्यांवर अंकुश नवीन नियमांमुळे कर वाचवण्यासाठी सादर केल्या जाणाऱ्या खोट्या भाडेपावत्यांवर आळा बसण्याची शक्यता आहे. अनेकदा करदाते आई-वडील किंवा नातेवाईकांच्या नावावर भाडे दाखवतात. आता नातेसंबंध उघड करणे बंधनकारक झाल्याने अशा व्यवहारांची पडताळणी करणे सोपे होणार आहे. यामुळे HRA दाव्यांमध्ये पारदर्शकता वाढेल, असे कर तज्ज्ञांचे मत आहे.
advertisement
4/5
<strong>काय माहिती द्यावी लागणार?</strong> नव्या नियमानुसार HRA क्लेम करताना पगारदार करदात्यांनी घरमालकाबाबत सविस्तर माहिती द्यावी लागेल. यामध्ये घरमालकाचे नाव, पत्ता, पॅन आणि त्याच्याशी असलेले नाते यांचा समावेश असेल.
advertisement
5/5
महत्त्वाचे म्हणजे, कुटुंबातील सदस्यांना भाडे देण्यास कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही. मात्र, अशा व्यवहारांसाठी वैध भाडेकरार असणे आवश्यक आहे आणि भाडे रोख स्वरूपात न देता बँकेद्वारे देणे गरजेचे आहे. तसेच, घरमालकानेही आपल्या आयकर विवरणपत्रात हे भाडे उत्पन्न म्हणून दाखवणे बंधनकारक असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
परत म्हणू नका! सांगितलं नाही, घरमालक भाडेकरूंसाठी १ एप्रिलपासून 'हे' नवीन नियम लागू होणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल