Suraj Chavan : 'शाळेत आमचं प्रेम होतं, ती दुसऱ्याबरोबर...' 'बच्चा' सोबत नेमकं काय झालेलं? सूरज चव्हाणने पहिल्यांदाच सांगितली ब्रेकअप स्टोरी
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Suraj Chavan Break Up : बिग बॉस विजेता सूरज चव्हाण पहिल्यांदाच त्याच्या ब्रेकअपविषयी बोलला आहे. सूरज चव्हाणचं त्याच्या बच्चा सोबत नेमकं काय झालेलं?
advertisement
1/8

रील स्टार आणि बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाणने त्याच्या आयुष्याची नवी सुरूवात केली आहे. डिसेंबर महिन्यात सूरज चव्हाणचं लग्न झालं. सूरजने त्याच्या मामाच्या मुलीशी लग्न केलं. सूरज आणि संजना त्यांच्या नव्या घरात त्यांचा सुखाचा संसार करत आहेत.
advertisement
2/8
संजना सूरजच्या आयुष्यात येण्याआधी सूरजच्या आयुष्यात त्याची 'बच्चा' होती. पण सूरज चव्हाणबरोबर गोलीगत धोका झाला असं त्याने अनेकदा सांगितलं. सूरज चव्हाणची बच्चा कोण होती आणि त्याचं ब्रेकअप कसं झालं याबाबत अनेकांना उत्सुकता होती. सूरजने त्याची संजनाबरोबरची लव्ह स्टोरी सांगताना त्याची ब्रेकअप स्टोरीही पहिल्यांदाच सांगितली.
advertisement
3/8
नुकत्यात एका मुलाखतीत बोलताना सूरज म्हणाला, "संजना माझ्या चुलत मामाची मुलगी आहे. माझा चुलता आहे सख्ख्या त्यांच्या चुलत मामाची मुलगी आहे. ते बोंडवे गावात राहतात. तिथे माझी सासरवाडी आहे. मी तिला लहानपणापासून पाहिलेलं. 'माझी बाय गो' गाण्यावर आम्ही व्हिडीओ काढलेला. लग्न झाल्यानंतर तो व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता."
advertisement
4/8
"जी नाय बोली तिला करून दाखवायचं. मला धोका भेटलेला आहे. मला गोलीगत धोका भेटला, मला इतका राग आला. मी जिद्दीला पेटलो. मग ठरवलं काय तरी बनायचं आहे. मग मी टिकटॉक स्टार बनलो."
advertisement
5/8
ब्रेकअपबद्दल बोलताना सूरज म्हणाला, "तिला गोरे मुलगा आवडला. मी कसा काळा सावळा आहे. मला कमी लेखलं." सूरज पुढे मिश्किल अंदाजात म्हणाला, "मी काळा सावळा आहे पण माझ्यामागे पोरी कमी नव्हत्या. मी हँडसम नाही चॉकलेट बॉय आहे. सगळे मला कॅडबरी म्हणतात."
advertisement
6/8
"ती त्याच्याबरोबर गेली. तिने जॉइन खातं सुरू केलं. गेली आता. काय करायचं. काहीच नाही करू शकत."
advertisement
7/8
सूरजने पुढे सांगितलं, "शाळेत आमचं प्रेम होतं. आठवीपर्यंत शिकलो. मी आठवी नापास आहे. मी सगळ्यात मागच्या बेंचवर बसायचो. सरांची नरज माझ्यावर. याला काही येत नाही. मार खायला पुढे असतो."
advertisement
8/8
सूरज चव्हाणचं शिक्षण आठवीपर्यंत झालं. त्याला लिहायला आणि वाचायला येत नाही. पण त्याने त्याच्या अंगी असलेल्या कलागुणांनी आणि स्वभावाने लाखोंची मनं जिंकली. जी जाण एखाद्या शिक्षित व्यक्तीलाही नाही ती सूरजला असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Suraj Chavan : 'शाळेत आमचं प्रेम होतं, ती दुसऱ्याबरोबर...' 'बच्चा' सोबत नेमकं काय झालेलं? सूरज चव्हाणने पहिल्यांदाच सांगितली ब्रेकअप स्टोरी