TRENDING:

RCB vs SRH : 201 धावा करूनही हारले, 8व्या ओव्हरला मॅच फिरली, काव्याच्या टीमच्या विलनने कोहलीला मॅच गिफ्ट केली

Last Updated:
सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या 201 धावांच्या लक्ष्याचा रॉयल चॅलेंजर्स यशस्वी पाठलाग करून हा सामना 6 विकेट राखून जिंकला आहे. आरसीबीच्या या विजयाच्या शिल्पकार हा विराट कोहली आणि देवदत्त पड्डीकल ठरला आहे.
advertisement
1/9
201 धावा करूनही हारले, 8व्या ओव्हरला मॅच फिरली, काव्याच्या टीमच्या विलनने कोहलीला मॅच गिफ्ट केली
आयपीएलच्या 2026 च्या हंगामातला पहिलाच सामना हा गतविजेत्या आरसीबीने जिंकला आहे. आरसीबीने 6 विकेट राखून सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला आहे.
advertisement
2/9
सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या 201 धावांच्या लक्ष्याचा रॉयल चॅलेंजर्स यशस्वी पाठलाग करून हा सामना 6 विकेट राखून जिंकला आहे. आरसीबीच्या या विजयाच्या शिल्पकार हा विराट कोहली आणि देवदत्त पड्डीकल ठरला आहे.
advertisement
3/9
दरम्यान या सामन्यात 201 धावा करून सनरायझर्स हैदराबाद कशी हारली असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर त्याला कारणीभूत एक कॅच ठरली आहे.
advertisement
4/9
खरं तर 8 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला हेन्री क्लासेनने विराट कोहलीची कॅच ड्रॉप केली होती.त्यावेळी विराट कोहली 28 धावांवर खेळत होता.जर तिकडे त्याची विकेट पडली असती तर मॅचचा निकाल वेगळा लागला असता.
advertisement
5/9
सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या 201 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात खराब झाली होती.कारण फिल सॉल्ट 8 धावांवर बाद झाला होता.
advertisement
6/9
सॉल्ट बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि देवदत्त पड्डीकलने आरसीबीचा डाव सावरसा होता. यावेळी पड्डीकलने 26 बॉलमध्ये 61 धावांचीव वादळी खेळी केली होती.
advertisement
7/9
त्यानंतर रजत पाटीदार आणि विराट कोहली मैदानात होता. पाटीदारने यावेळी 12 बॉलमध्ये 31 धावांची खेळी केली.त्यानंतर शेवटी टीम डेविड 16 आणि विराट 61 वर नाबाद राहिला. अशाप्रकारे आरसीबीने 94 बॉलमध्ये मॅच जिंकली.
advertisement
8/9
दरम्यान या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 201 धावा केल्या होत्या. ईशान किशनच्या 38 बॉलमध्ये 80 आणि हेनरिक क्लासनेच्या 22 बॉलमध्ये 31 धावांची खेळी केली होती.
advertisement
9/9
तसेच शेवटच्या क्षणी अनिकेत वर्माच्या 43 धावांच्या बळावर हैदराबादने 201 धावा केल्या आहेत. त्यामुळे आरसीबीसमोर 202 धावांचे लक्ष्य होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
RCB vs SRH : 201 धावा करूनही हारले, 8व्या ओव्हरला मॅच फिरली, काव्याच्या टीमच्या विलनने कोहलीला मॅच गिफ्ट केली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल