देवदत्त पडिक्कलने 26 बॉलमध्ये 234.62 च्या स्ट्राईक रेटने 61 रन केले ज्यात 4 सिक्स आणि 7 फोरचा समावेश होता. या सामन्याआधी देवदत्त पडिक्कलला आरसीबीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल का नाही? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या, कारण आरसीबीने लिलावामध्ये व्यंकटेश अय्यरला 7 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. तर देवदत्त पडिक्कलला 2 कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं होतं.
advertisement
व्यंकटेश अय्यर याला आयपीएल 2025 नंतर रिलीज केलं होतं. आयपीएलच्या मागच्या मोसमात व्यंकटेश अय्यरला तब्बल 23.75 कोटी रुपये मिळाले होते, पण निराशाजनक कामगिरीनंतर अय्यरला केकेआरने रिलीज केलं. यानंतर आरसीबीने लिलावात अय्यरवर 7 कोटी रुपयांची बोली लावली.
पडिक्कलवर विश्वास
व्यंकटेश अय्यर हा बॅटिंगसोबतच मीडियम फास्ट बॉलिंगचा पर्यायही देतो. जॉश हेजलवूड, यश दयाळ आणि नुवान तुषारा हे फास्ट बॉलर उपलब्ध नसल्यामुळे आरसीबी व्यंकटेश अय्यरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात होती, पण आरसीबीने पडिक्कलवर विश्वास दाखवून त्याला तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवलं. टीमने दाखवलेला हा विश्वास पडिक्कलने सार्थ ठरवला आणि मोठ्या स्कोअरचा पाठलाग करताना आरसीबीला धमाकेदार सुरूवात करून दिली.
