TRENDING:

IPL 2026 : आईचं निधन, वडिलांचं दुसरं लग्न, काकांनी वाढवलेला अनिकेत झाला पहिल्याच सामन्याचा हिरो!

Last Updated:
आयपीएल 2026 च्या मोसमाला सुरूवात झाली आहे. या मोसमाच्या पहिल्याच सामन्यात सनरायजर्स हैदराबादने आरसीबीविरुद्ध 200 रनचा टप्पा पार केला. या सामन्यात अनिकेत वर्मा हैदराबादचा अनसंग हिरो ठरला.
advertisement
1/10
आईचं निधन, वडिलांचं दुसरं लग्न, काकांनी वाढवलेला अनिकेत झाला पहिल्याच सामन्याचा हिरो!
हैदराबादकडून कर्णधार इशान किशनने 38 बॉल 80 रनची वादळी खेळी केली, तर सातव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या अनिकेत वर्माने 18 बॉलमध्ये 238.89 च्या स्ट्राईक रेटने 43 रन केल्या, ज्यात 4 सिक्स आणि 3 फोरचा समावेश होता.
advertisement
2/10
24 वर्षांच्या अनिकेत वर्माने 2 वर्षांपूर्वी एमपी प्रीमियर लीगमध्ये 32 बॉलमध्ये शतक ठोकलं. क्रिकेटपटू बनण्यासाठी आणि आयपीएलमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळण्यासाठी अनिकेतला बराच संघर्ष करावा लागला.
advertisement
3/10
अनिकेत वर्मा लहान असतानाच त्याच्या आईचं निधन झालं, यानंतर वडिलांनी दुसरं लग्न केलं, त्यामुळे अनिकेतचे काका त्याला त्याच्या घरी घेऊन आले. अनिकेतने भारतासाठी खेळावं आणि मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवावा आणि हा पुरस्कार मला डेडिकेट करावा, असं आपलं स्वप्न असल्याचं अनिकेतचे काका म्हणाले.
advertisement
4/10
2010 साली अनिकेत माझ्याकडे आला, तो गरीब घरातला होता, त्यामुळे मी त्याच्याकडून फी घेतली नाही. माझ्या अकादमीममध्ये इतक्या सुविधा नव्हत्या, त्यामुळे मी त्याला ज्योती भाईंकडे अंकुर अकादमीममध्ये ट्रेनिंगला पाठवलं, त्यांनीही अनिकेतला फ्री ट्रेनिंग दिली, असं अनिकेतचे कोच नंदजीत म्हणाले.
advertisement
5/10
अनिकेतकडे एक वेळ अशी अली की भोपाळमध्ये त्याला राहायला घर नव्हतं. घर मालकाने त्याला घर खाली करायला सांगितलं, त्यानंतर अनिकेतच्या काकांच्या सांगण्यावरून त्याला माझ्या घरी ठेवलं आणि त्याच्याकडून भाडंही घेतलं नाही. 3 वर्ष तो माझ्या फ्लॅटमध्ये राहिला, असं कोचने सांगितलं.
advertisement
6/10
आयपीएल खेळण्याबाबत मी उत्सुक आहे, कारण खूप गोष्टी शिकायला मिळतात. मला हार्दिक पांड्याला भेटायचं आहे. त्याच्यासोबत फिटनेस बॅट फ्लो आणि त्याच्या हिटिंग पॉवरबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. तसंच कोहलीकडून ऑन द राईज फ्लिक, रोहितकडून पुल आणि पंतकडून फ्लिक शॉट शिकायचा आहे, असं अनिकेत म्हणाला आहे.
advertisement
7/10
'माझा काका कायमच माझ्यासोबत होता. माझ्यापेक्षा माझ्या काकांचा संघर्ष जास्त होता. तेदेखील आर्थिकदृष्ट्या जास्त सशक्त नव्हते, तरीही त्यांनी मला कोणत्याच गोष्टीची कमी जाणवून दिली नाही. ते स्वत:च्या गरजा पूर्ण करायचे नाहीते, पण माझ्या करायचे', असं अनिकेत म्हणाला.
advertisement
8/10
'माझ्या घरची परिस्थिती ठीक नव्हती, सगळ्यात आधी मी रेल्वे युथ क्रिकेट क्लबमध्ये गेलो, तिथे नंदजीत सरांनी मला बेसिक शिकवलं. यानंतर अंकुरमध्ये ज्योतीप्रकाश त्यागी सरांनी माझी बॅटिंग सुधरवली', असं अनिकेतने सांगितलं.
advertisement
9/10
'मी अंडर-14 डिव्हिडन मॅच खेळत होतो, तेव्हा काकांनी एका मित्राकडून उधार पैसे घेऊन मला ऍन्ड्रॉईड फोन घेऊन दिला, पण ते स्वत: की-पॅड फोन वापरायचे', हे सांगताना अनिकेत भावुक झाला.
advertisement
10/10
'विराट कोहली माझा हिरो आहे, मला त्याचा इंटेट आवडतो. तो शून्यवर आऊट झाला किंवा 100 रन करून आऊट झाला तरी मैदानात तो जी उर्जा दाखवतो ती कमाल आहे. फिल्डिंग करत असताना तो बॉलरपेक्षा जास्त सेलिब्रेट करतो. मला त्याची मेलबर्नची इनिंग सर्वाधिक आवडते', असं अनिकेत म्हणाला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : आईचं निधन, वडिलांचं दुसरं लग्न, काकांनी वाढवलेला अनिकेत झाला पहिल्याच सामन्याचा हिरो!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल