Success Story : हातात नव्हतं काम, मित्राने दिला साबण निर्मितीचा सल्ला, आता महिन्याला 1 लाख उलाढाल
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
वैष्णवी प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे. या माध्यमातून ते निम साबण निर्मिती करत आहेत. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी तब्बल 11 महिलांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे.
advertisement
1/7

प्रत्येकाला वाटते स्वतःचा व्यवसाय असावा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कवडगाव येथील ज्ञानेश्वर गव्हाड यांनी याच गोष्टीला सातत्यात उतरवले आहे.
advertisement
2/7
त्यांनी वैष्णवी प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे. या माध्यमातून ते निम साबण निर्मिती करत आहेत. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी तब्बल 11 महिलांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे.
advertisement
3/7
ज्ञानेश्वर गव्हाड यांना कोरोना काळात हाताला काम नव्हते. रोजंदार म्हणून देखील कोणी काम देत नव्हते. घरी खाण्याची देखील आबाळ होऊ लागली.
advertisement
4/7
त्यांना काय करावे हा प्रश्न समोर असताना मित्राने निम पेस्ट तयार करण्याची कल्पना सांगितली. त्यानंतर बदनापूर येथे प्रशिक्षण घेऊन निम साबण निर्मितीचा गृह उद्योग सुरू केला.
advertisement
5/7
त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून तब्बल 11 कुटुंबांचा उदरनिर्वाह होतो. मराठवाड्यातील 4 जिल्ह्यांत कुरिअरद्वारे निम साबण पोहोचवली जाते.
advertisement
6/7
150 रुपयांना दोन अशी या साबणाची किंमत आहे. महिन्याला 1000 साबणांची विक्री होत असून 1 लाख रुपयांची उलाढाल तर 50 हजार रुपये निव्वळ नफा राहत असल्याचे ज्ञानेश्वर गव्हाड यांनी सांगितले.
advertisement
7/7
या साबण निर्मितीसाठी भोकर, निम पावडर, रीठा, पळस, पळस फुल पावडर, चिंचोका पावडर, आणि सुगंधी परफ्युम हे घटक वापरले जातात. सर्व नैसर्गिक घटक असल्याने या साबणाचे शून्य साईड इफेक्ट आहेत. अन् त्वचारोगावर ही साबण गुणकारी असल्याचे गव्हाड यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Success Story : हातात नव्हतं काम, मित्राने दिला साबण निर्मितीचा सल्ला, आता महिन्याला 1 लाख उलाढाल