पुण्यातील नोकरी सोडली, इंजिनिअर तरुणानं गावात उभारला तेलाचा ब्रँड, कमाईचा आकडा तर पाहाच
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
संदीप नंदकिशोर कापसे याने खाजगी नोकरी सोडून व्यवसाय सुरू केला आहे. तो लाकडी घाण्याच्या तेल व्यवसायातून महिन्याला 3 ते 4 लाखांची उलाढाल करत आहे.
advertisement
1/5

अनेक तरुणांचे स्वप्न असतं की स्वतःचा काही ना काही व्यवसाय असावा. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी संदीप नंदकिशोर कापसे यांनी खाजगी नोकरी सोडून व्यवसाय सुरू केला आहे. लाकडी घाण्याच्या तेल व्यवसायातून महिन्याला 3 ते 4 लाखांची उलाढाल करत आहे.
advertisement
2/5
सोलापुरातील माढा तालुक्यातील संदीप कापसे यांचे शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरिंगपर्यंत झाले आहे. त्याने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही वर्षे पुणे येथे खाजगी नोकरी केली. परंतु वाढती महागाई आणि नोकरीतून मिळणाऱ्या पगारातून कोणतीही बचत होत नसल्याने नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
3/5
पुणे येथून सोलापुरात आल्यानंतर संदीप यांनी रहस्य या नावाने व्यवसायाला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी सुरुवातीला त्यांनी लाकडी घाण्याच्या माध्यमातून शेंगदाणा तेल आणि करडई तेल तयार करून विक्री करण्यास सुरुवात केली. हा व्यवसाय नवीन असल्यामुळे सुरुवातीच्या काळात विक्री करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र सातत्य, ग्राहकांचा विश्वास आणि योग्य मार्केटिंगच्या जोरावर त्यांनी व्यवसायात हळूहळू प्रगती साधली.
advertisement
4/5
आज संदीप कापसे यांनी रहस्य या नावाला एक ब्रँड म्हणून ओळख मिळवून दिली आहे. लाकडी घाण्यापासून तेल तयार करण्याबरोबरच गूळ पावडर, गूळकळी, गुलकंद, सेंद्रिय हळद तसेच आवळ्यापासून विविध उत्पादने तयार करण्याचे काम ते करत आहेत. त्यांच्या या व्यवसायातून सध्या महिन्याला सुमारे 3 ते 4 लाख रुपयांची उलाढाल होत आहे.
advertisement
5/5
संदीप कापसे सांगतात की, तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी व्यवसायाकडे वळावे. सुरुवातीला काही अडचणी येतात, मात्र चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश नक्की मिळते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
पुण्यातील नोकरी सोडली, इंजिनिअर तरुणानं गावात उभारला तेलाचा ब्रँड, कमाईचा आकडा तर पाहाच