TRENDING:

BBM 6 Elimination : TOP 10 मध्ये येऊन प्रभू शेळके आऊट! घराबाहेर जाऊन काय करणार? सांगितला सगळा प्लान

Last Updated:
Prabhu Shelke Out From Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठीच्या घरातून प्रभू शेळके आऊट झाला आहे. घराबाहेर आल्यानंतर तो काय करणार याचा प्लान त्याने सांगितला.
advertisement
1/9
TOP 10 मध्ये येऊन प्रभू शेळके आऊट! घराबाहेर जाऊन काय करणार? सांगितला सगळा प्लान
Bigg Boss Marathi च्या 6 व्या सीझनमध्ये आणखी एलिमिनेशन झालं. टॉप 10 मध्ये पोहोचलेला स्पर्धक प्रभू शेळके अखेर घराबाहेर पडला.
advertisement
2/9
मराठवाड्यातून आलेला प्रभू स्वतःला 'डॉन' म्हणवतो. पण लोकांना घाबरवणारा नाही तर हसवणारा डॉन म्हणून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याचा साधेपणा आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे तो प्रेक्षकांच्या लक्षात राहणार आहे.
advertisement
3/9
बिग बॉसच्या घरात 'काटा गँग' म्हणून ओळखली जाणारी टोळी ज्यात रेवा, दिपाली, प्रभू आणि राकेश डेंजर झोनमध्ये होते. यांच्यातील एक सदस्य घराबाहेर जाणार होता. ज्याला फोटो फ्रेम मिळेल तो सुरक्षित आणि ज्याला मिळणार नाही तो घराबाहेर जाणार होता. या टास्कमध्ये प्रभूला फोटो फ्रेम मिळाली नाही आणि त्याचा बिग बॉसमधील प्रवास इथेच संपला.
advertisement
4/9
प्रभूच्या एलिमिनेशननंतर घरातील वातावरण भावुक झालं. प्रभूची बहिण तन्वीला भावना आवरता आल्या नाहीत. ती ओक्शाबोक्शी रडताना दिसली. 'नावाची पाटी मीच लावली होती आणि काढूनही मीच दिली' असं म्हणत ती खूपच भावूक झाली.
advertisement
5/9
मात्र प्रभूने हा क्षण खूप शांतपणे हाताळला. तो म्हणाला, "इथून इथपर्यंत यायचं माझं स्वप्न होतं. आई-पप्पा इथपर्यंत यायला पाहिजे होतं हे माझं स्वप्न होतं ते पूर्ण झालं. हसत खेळ खेळत चाललो आहे मी. मला दु:ख नाही. मी एकही पाण्याचा ठिपका माझ्या डोळ्यातून येऊ देणार नाही. बसं."
advertisement
6/9
"बिग बॉस थँक्यू. तुम्ही मला सांभाळलं. माझ्या हेल्थची काळजी घेतली. खूप भारी वाटलं. चांगलं रहा, काटा स्ट्राँग आहे", असंही प्रभू म्हणाला.
advertisement
7/9
घरातून बाहेर येण्यासाठी सागरने प्रभूला विचारलं की, आता पुढे काय करणार? यावर प्रभूने घराबाहेर पडल्यानंतरचा त्याचा पुढचा प्लान सांगितला. प्रभू म्हणाला "मी शाळा शिकणार."  सागरने विचारलं कितवी पर्यंत? प्रभू म्हणाला, बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करणार.
advertisement
8/9
घरातून बाहेर पडताना प्रभूने रितेशशी संवाद साधला. तो म्हणाला, "खूप भारी वाटलं. इतके आठवडे टिकून राहिलो. महाराष्ट्राने मला खूप प्रेम आणि सपोर्ट दिला त्याबद्दल मनापासून आभार. माझा प्रवास असाच सुरू ठेवणार. थांबणार नाही."
advertisement
9/9
प्रभू शेळकेच्या एलिमिनेशनमुळे बिग बॉस मराठी 6nमध्ये आता स्पर्धा आणखी रंगतदार होणार आहे. तन्वीला तिकिट टू फिनाले मिळालं आहे. आता प्रभूनंतर आणखी एक स्पर्धक घराबाहेर जाणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
BBM 6 Elimination : TOP 10 मध्ये येऊन प्रभू शेळके आऊट! घराबाहेर जाऊन काय करणार? सांगितला सगळा प्लान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल