TRENDING:

Kalyan Viral Video : कल्याण स्थानक बनलं कुस्तीचा आखाडा! रेल्वे प्लॅटफॉर्मवरच एकमेकांना धु-धु धुतले; VIDEO तुफान व्हायरल

Last Updated:

Kalyan Railway Station Viral Video : कल्याण रेल्वे स्थानकावर उतरण्याच्या कारणावरून दोन प्रवाशांमध्ये भयंकर घटना घडली आहे . मध्यस्थीला गेलेल्या दिव्यांगालाही राग अनावर झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कल्याण : मुंबई आणि उपनगरातील नागरिकांचा रोजचा प्रवास लोकल ट्रेनवरच अवलंबून असतो. या लोकल प्रवासादरम्यान प्रवाशांना विविध अनुभवांना सामोरे जावे लागते. ज्यात कधी किरकोळ कारणावरून जसे धक्का लागल्याने वाद निर्माण होतात तर कधी प्रवासी एकमेकांना मदतीचा हात देताना देखील पाहायला मिळतात.
कल्याण रेल्वे स्थानकावर दोन प्रवाशांमध्ये झालेल्या हाणामारीचा क्षण कॅमेऱ्यात कैद
कल्याण रेल्वे स्थानकावर दोन प्रवाशांमध्ये झालेल्या हाणामारीचा क्षण कॅमेऱ्यात कैद
advertisement

कल्याण स्थानकात प्रवाशांचा धिंगाणा

लोकल म्हटलं की सोशल मीडियावर अनेक असे व्हिडिओ आजपर्यंत व्हायरल झालेले आहे कधी महिलांनी लोकलच्या डब्यात होहाळे जेवण तर कधी कोणता सण. पण यात आली ती लोकलची भरमसाठ गर्दी.या गर्दीमुळेही बऱ्याचदा महिलांमध्ये तुफान हाणामारी झालेली आहे तर कधी पुरुषांमध्येही वाद झालेली आहे. सध्या नुकताच एक लोकलमधील तुफान हाणामारीचा वाद व्हायरल होत आहे. ज्यात नेमका वाद कशावरुन सुरु झाला हे एकदा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत पाहा.

advertisement

नेमकं घडलं तरी काय?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, लोकलही कल्याण स्थानकात येताच प्रत्येक प्रवासी खाली उतरण्याच्या गडबडीत असतो, दरम्यान ट्रेनमधून उतरताना झालेल्या एका क्षुल्लक कारणावरुन दोन प्रवाशांमध्ये सुरुवातील बाचाबाची झाली होती. पण काही क्षणांतच हा वाद वाढला आणि हाणामारीपर्यंत पोहचला. दोघांनी प्लॅटफॉर्मच एकमेकांना ढकलण्यास, ओढण्यास सुरुवात केली, त्यामुळे प्लॅटफॉर्म सर्व प्रवाशांची गर्दी जमून एकच गोंधळ उडाल्याचे व्हिडिओत दिसत आहेत.

advertisement

View this post on Instagram

भांडण थांबवताना परिस्थिती अधिकचं...

एवढेचं नाही तर ही हाणामारी सुरु असताना सर्व परिस्थिती शांत करण्यासाठी एक दिव्यांग व्यक्ती पुढे आला मात्र आधीचा गोंधळ वाढत गेल्याने त्याचाही संयम सुटला आणि तोही त्या वादात अडकला, त्यामुळे प्लॅटफॉर्मचे वातावरण जास्त तणावपूर्ण बनले. पण काही वेळाने इतर प्रवाशांनी त्यांना शांत करत भांडण थांबवले.

advertisement

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात लिंबूचे दर तापले, कांद्याला सरासरी दर, APMC मार्केटमधून नवी अपडेट
सर्व पहा

सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरील ''jilha.varta''या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमधून नेमकी ही घटना कशामुळे घडली त्याबद्दल सांगितेल आहे. अचानक सुरु झालेल्या या भांडणाचा हा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. पाहता पाहता काही मिनिटांतच हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होऊ लागला आणि व्हायरलही झाला.

advertisement

मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan Viral Video : कल्याण स्थानक बनलं कुस्तीचा आखाडा! रेल्वे प्लॅटफॉर्मवरच एकमेकांना धु-धु धुतले; VIDEO तुफान व्हायरल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल