TRENDING:

पहिल्याच फिल्ममध्ये पटकावला राष्ट्रीय पुरस्कार; तरी हिरोचं नाव ऐकताच हिरोईन फिल्मला द्यायच्या नकार, नंतर बनला सुपरस्टार

Last Updated:
करिअरच्या सुरुवातीलाच राष्ट्रीय पुरस्कार जिंकूनही या अभिनेत्याला अभिनेत्रींकडून नकार मिळत होता. या अभिनेच्याचं बॉलिवूडमधील यश म्हणजे कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही.
advertisement
1/7
पहिल्याच फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार; तरी हिरोचं नाव ऐकताच हिरोईन फिल्मला द्यायच्या नकार, नंतर बनला सुपरस्टार
बॉलिवूडमध्ये कित्येक कलाकारांचा प्रवास सोपा नव्हता. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात खडतर होती. एक अभिनेता तर असा ज्याचं नाव ऐकताच त्याच्यासोबत फिल्ममध्ये काम करायला अभिनेत्री नकार द्यायचा. पण 1979 साली असा चमत्कार घडला की या अभिनेत्याचं नशीबच रातोरात बदललं. तो सुपरस्टार झाला.
advertisement
2/7
त्या काळात बॉलिवूडमध्ये सावळा-गोरा याचा खूप विचार केला जायचा. हा अभिनेता सावळा, तसंच त्याची बॉडीही नीट नव्हती. रिपोर्टनुसार अनेक दिग्दर्शकांनी त्याला नकार दिला होता, कारण त्याच्याकडे नायिका नव्हती आणि त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्री त्याच्यासोबत धोका पत्करण्यास कचरत होत्या.
advertisement
3/7
पहिल्या फिल्ममध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळवूनही हा अभिनेता सतत नकार पचवत होता. त्या टप्प्यातून जात असताना एक दिग्दर्शक उत्स्फुर्त अभिनेत्याच्या शोधात होता, ज्याच्याच्यात नवीन अनोखी ऊर्जा असेल आणि अखेर या अभिनेत्याची निवड झाली.
advertisement
4/7
पण सर्वात मोठं आव्हान होतं होतं त्याच्यासाठी अभिनेत्री शोधण्याचं. त्या वेळी रंजीता कौर इंडस्ट्रीतील एक उदयोन्मुख आणि प्रतिष्ठित नाव होतं. त्यांनी या अभिनेत्यासोबत काम करायला होकार दिला. त्यांनी त्याच्या रूपावर किंवा स्टारडमपेक्षा त्याच्या प्रतिभेवर अधिक विश्वास ठेवला आणि रंजीताचा होकार या अभिनेत्याच्या कारकिर्दीसाठी जीवनरेखा ठरली.
advertisement
5/7
1979 साली ही फिल्म रिलीज झाली आणि इतकी हिट झाली की बॉक्स ऑफिसवरील त्याच्या यशाने चित्रपट समीक्षकांना चकित केलं. प्रेक्षकांना या अभिनेत्याची रंजीताची केमिस्ट्री  इतकी नैसर्गिक आणि ताजी होती की प्रेक्षकांना ही जोडी खूप आवडली. या चित्रपटाने केवळ प्रचंड नफाच कमावला नाही, तर अभिनेत्याला स्टार टॅगही मिळवून दिला.
advertisement
6/7
असं म्हटलं जातं की या फिल्मच्या यशानंतर वातावरण पूर्णपणे बदललं. ज्या अभिनेत्री पूर्वी अभिनेत्याचं नाव ऐकताच चित्रपट नाकारायच्या त्या त्याच्यासोबत काम करण्यासाठी आपल्या तारखा जुळवून घेऊ लागल्या.
advertisement
7/7
हा अभिनेता म्हणजे मिथुन चक्रवर्ती. ज्याला आज बॉलिवूडचे ग्रँडमास्टर म्हणून ओळखलं जातं. ते पुढे 'डिस्को डान्सर' आणि भारतीय सिनेमातील बड्या हिरोंपैकी एक बनले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पहिल्याच फिल्ममध्ये पटकावला राष्ट्रीय पुरस्कार; तरी हिरोचं नाव ऐकताच हिरोईन फिल्मला द्यायच्या नकार, नंतर बनला सुपरस्टार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल