TRENDING:

Aajache Rashibhavishya: कामदा एकादशीला शुभयोग, मेष ते मीन राशीवाले ‘या’ चुका टाळा, इथं पाहा आजचं राशीभविष्य

Last Updated:
Daily Horoscope: आज कामदा एकादशी. ग्रह, नक्षत्रांच्या बदलांचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होईल? ज्योतिषी अशोक पाटील यांच्याकडून आजचं राशीभविष्य जाणून घेऊ.
advertisement
1/13
कामदा एकादशीला शुभयोग, मेष ते मीन राशीवाले ‘या’ चुका टाळा, इथं पाहा आजचं राशीभविष्य
मेष राशीच्या व्यक्तीसाठी आजचा रविवार खास असणार असून आज धनलाभाचा योग आहे. आज तुम्हाला सर्वच ठिकाणी मान सन्मान मिळेल. जवळच्या व्यक्तींवर पैसे खर्च कराल. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आणि बुध दोन्ही एकादश म्हणजे लाभ स्थानात भ्रमण करत आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
advertisement
2/13
वृषभ राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस ठीक असणार आहे. छोट्या मोठ्या अडचणीचा सामना करावा लागेल परंतु संयमाने काम केल्यास या अडचणींवर मात कराल. कामाच्या ठिकाणी विरोधकांकडून काही गोष्टींना विरोध होईल त्यामुळे संयम ठेवणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्याची काळजी घ्या.
advertisement
3/13
मिथुन राशीसाठी आजचा रविवार हा चांगला असणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी बुध नवम स्थानात असल्याने व्यावसायिक क्षेत्रात चांगली प्रगती कराल. अचानक आनंदाची बातमी मिळेल. आज जे काम कराल त्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. नवीन गोष्टींची सुरुवात करायला आजचा दिवस उत्तम आहे.
advertisement
4/13
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ योग घेऊन येत आहे. आज तुम्ही घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला भविष्यात खूप मोठा फायदा मिळवून देऊ शकतात. व्यवसायात प्रगती होईल. स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ द्या.
advertisement
5/13
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सोने पे सुहागा अशा पद्धतीचा असणार आहे. तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. प्रलंबित कामे पूर्ण होतील तसेच नवीन संधी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. एकूणच आजचा दिवस समाधानकारक असणार आहे.
advertisement
6/13
कन्या राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस अनेक आव्हाने घेऊन येणारा आहे. अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कोणताही निर्णय तडकाफडकी घेऊ नका. नव्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. परंतु प्रत्येक जबाबदारी तुम्ही योग्य पद्धतीने पार पाडाल.
advertisement
7/13
तुळ राशीसाठी आजचा दिवस ठीक असणार आहे. खूप मेहनत करूनही अपेक्षित फळ मिळण्याची शक्यता कमी आहे. तूळ राशीचा स्वामी शुक्र सप्तम स्थानात आहे तसेच गुरु नवम स्थानात मार्गी स्थितीत आहे. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण होऊ शकते. आर्थिक खर्च जास्त होण्याची शक्यता आहे. मानसिक अस्थिरता जाणवेल.
advertisement
8/13
आज तुमच्यासाठी भाग्याचा दिवस ठरू शकतो. जुने अडथळे दूर होतील. नोकरीत प्रमोशन किंवा कौतुक मिळू शकते. व्यवसायात चांगली वाढ होईल. मात्र कुणावरही अति विश्वास ठेवू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या.
advertisement
9/13
धनु राशीच्या लोकांसाठी रविवारचा दिवस शुभ ठरण्याची शक्यता आहे. कारण राशीचा स्वामी गुरु सध्या मिथुन राशीत असून चंद्र कर्क राशीत अष्टम स्थानात भ्रमण करत आहे. या ग्रहस्थितीमुळे सरकारी कामांमध्ये यश मिळण्याचे संकेत आहेत तसेच घरातील सुख-समृद्धीत वाढ होईल. आज आर्थिक लाभाचे योग तयार होत असून अडचणीच्या वेळी मदत मिळू शकते.
advertisement
10/13
मकर राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज तुम्हाला मेहनतीचे फळ चाखायला मिळेल. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान वाढेल. आर्थिक बाजू मजबूत राहील. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस आहे. घरातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल.
advertisement
11/13
कुंभ राशीच्या व्यक्तीसाठी आजचा रविवार हा धनलाभाचे योग घेऊन येत आहे. आज कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्याकडे पैसे येतील. तुमच्या राशीचा स्वामी शनि द्वितीय धन स्थानात स्वतंत्रपणे भ्रमण करतो आहे त्यामुळे मेहनतीचे फळ मिळेल. जवळच्या व्यक्तीसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे.
advertisement
12/13
आजचा दिवस मीन राशीसाठी खूप चांगला जाणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल आणि महत्त्वाच्या कामात यश मिळेल. पैशाच्या बाबतीत फायदा होण्याची शक्यता असून अचानक लाभही होऊ शकतो. प्रेमसंबंधात समजूतदारपणा वाढेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: कामदा एकादशीला शुभयोग, मेष ते मीन राशीवाले ‘या’ चुका टाळा, इथं पाहा आजचं राशीभविष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल