TRENDING:

Aajache Rashibhavishya: मेष ते मीन राशीवाले जरा जपून, शनिवारी हवं ते मिळेल, पण चुका भोवणार, आजचं राशीभविष्य

Last Updated:
Daily Horoscope: मेष ते मीन राशींसाठी शनिवारी संधी आणि आव्हानं दोन्ही असतील. ज्योतिषी अशोक पाटील यांच्याकडून आजचं राशीभविष्य जाणून घेऊ.
advertisement
1/13
मेष ते मीन राशीवाले जरा जपून, शनिवारी हवं ते मिळेल, पण चुका भोवणार, आजचं राशीभविष्य
मेष राशीसाठी आजचा दिवस चांगला जाणार असून तुमच्या राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्र आणि द्वादश स्थानात शनि येत असल्याने तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला यश मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्या. एकूणच आजचा दिवस हा आनंदाचा आणि समाधानकारक असणार आहे.
advertisement
2/13
वृषभ राशीच्या व्यक्तींचे आज आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. आज दिवसभरात तुम्ही अनेक ठिकाणी पैसे खर्च करणार आहात. स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी खरेदी कराल. आजच्या दिवशी तुम्ही जे काम करणार आहात त्यात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या ग्रहांची स्थिती अनुकूल असल्याने तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा जाणार आहे.
advertisement
3/13
मिथुन राशीच्या व्यक्तीसाठी देखील आजचा दिवस हा शुभ असणार आहे. तुमच्या द्वितीय स्थानात चंद्र आणि नवम भाग्य स्थानात कुंभ राशीचा राहू असल्याने तुम्हाला मान-सन्मान मिळणार आहे. कुटुंबातील किंवा जवळच्या व्यक्तीची तुम्हाला कामामध्ये मदत होईल. तसेच चोरी देखील होण्याची शक्यता आहे त्यामुळे योग्य दक्षता घ्या.
advertisement
4/13
कर्क राशीसाठी आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा जाणार आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या राशीवर मिथुनमधील गुरु आणि प्रथम स्थानातील चंद्र यांचा प्रभाव असल्याने तुम्ही कुटुंबासाठी खर्च करणार आहात. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही करत असलेल्या कामाचं कौतुक होईल. कुटुंबासोबत मतभेद होण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे संयमाने वागा.
advertisement
5/13
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठीक असणार आहे. अनेक प्रलंबित कामे मार्गी लागतील. तुमच्या बोलण्याने कोणी दुखावणार नाही याची काळजी घ्या. कोणत्याही परिस्थितीत शांत राहणं महत्त्वाचं आहे. प्रत्येकाशी आदराने वागा. कामासोबत स्वतःला वेळ द्या.
advertisement
6/13
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा भावनिक असणार आहे. तुमच्या राशीतील योगामुळे आज वादविवाद होण्याची शक्यता आहे. या सगळ्यामुळे तुम्हाला मानसिक ताणही जाणवेल. त्यामुळे कोणासोबत वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या. अचानक काही चांगले बदल होतील. कामाचं योग्य नियोजन करा.
advertisement
7/13
तुळ राशीसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. मित्रपरिवाराकडून मदत मिळण्याची दाट शक्यता आहे. घरात शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. आर्थिक स्थिती सुधारेल. नवीन वस्तू खरेदी करण्याचा योग आहे. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील. व्यवसायात भागीदारी फायदेशीर ठरू शकते.
advertisement
8/13
वृश्चिक राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस अनेक शुभ योग घेऊन येत आहे. अचानक आनंदाची बातमी मिळेल. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण होतील. नवीन गोष्टींची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. आर्थिक गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कामावर फोकस करा.
advertisement
9/13
धनु राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस हा संमिश्र असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नीट नियोजनाने काम करणं महत्त्वाचं आहे. जवळच्या व्यक्तीसोबत गैरसमज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामासोबतच कुटुंबाला सुद्धा वेळ द्या. आरोग्याच्या तक्रारी जाणू शकतात.
advertisement
10/13
मकर राशीसाठी आजचा दिवस मेहनतीचा असेल. कामात जबाबदारी वाढू शकते. संयम आणि शिस्त ठेवल्यास यश मिळेल. नवीन करार किंवा डील फायदेशीर ठरू शकते. पैसे मिळण्याचे योग आहेत, पण खर्चावर नियंत्रण ठेवा आणि बचत करा. प्रवासाचा योग आहे.
advertisement
11/13
कुंभ राशीसाठी आजचा दिवस नवीन संधी घेऊन येईल. तुमचे विचार वेगळे असतील आणि लोक तुमच्या कल्पनांचे कौतुक करतील. आर्थिक स्थिती ठीक राहील. मित्रांशी संबंध मजबूत होतील. तसेच कुंभ राशीचा स्वामी शनि शनिवारी द्वितीय स्थानात असल्याने राजकीय क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभागी होण्याचा योग आहे.
advertisement
12/13
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. ऑफिसमध्ये मान-सन्मान मिळेल. मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: मेष ते मीन राशीवाले जरा जपून, शनिवारी हवं ते मिळेल, पण चुका भोवणार, आजचं राशीभविष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल